शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

विना पासिंग वाहन दिल्याने डिलर्सचा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 7:56 PM

विना पासिंग वाहने वितरीत केल्याप्रकरणी शहरातील तब्बल ११ वाहन वितरकांचा परवाना ७ दिवसांसाठी निलंबित करण्याचा आदेश प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.

ठळक मुद्देआरटीओचा दणका : शहरातील ११ वाहन डिलरवर निलंबानाची कारवाईआरटीओची तपासणी पथकामार्फत अशा वाहनांची शोध मोहीम

पुणे : ग्राहकांच्या आग्रहाला बळी पडून विना पासिंग वाहने वितरीत करणे शहरातील वाहन डिलर्सला (वितरक) चांगलेच महागात पडले आहे. विना पासिंग वाहने वितरीत केल्याप्रकरणी शहरातील तब्बल ११ वाहन वितरकांचा परवाना ७ दिवसांसाठी निलंबित करण्याचा आदेश प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. केंद्रीय मोटार वाहन अधिनियमानुसार वाहनाची नोंदणी केल्याशिवाय वाहन चालविता येत नाही. असे वाहन वापरणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्याबाबत वाहन वितरक आणि ग्राहकांना देखील कल्पना असते. मात्र, शहरात विना क्रमांची वाहने सर्रास फिरताना दिसतात. आरटीओने यापूर्वी विना नोंदणीची वाहने जप्त करण्यात येतील असे जाहीर केले होते. विना पासिंग वाहन वापरल्याने वैयक्तिक आणि सामाजिक नुकसानीची कल्पना देऊनही या नियमाचे पालन करण्यात कसूर होत होती. या प्रकरणी वाजिद खान यांनी आरटीओकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतरही दखल न घेतल्याने खान यांनी आरटीओला वकीलामार्फत नोटीस बजावली होती. त्यानंतर आरटीओने तपासणी पथकामार्फत अशा वाहनांची शोध मोहीम हाती घेतली होती. त्यात आढळलेल्या विना पासिंगचे वाहनांच्या वितरकांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली. त्यात दोषी आढळलेल्या अकरा वाहन वितरकांचा परवाना सात दिवसांसाठी निलंबित करण्याचा आदेश सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जयवंत गायकवाड यांनी दिला. म्हणजे, या काळात त्यांना वाहन विकता येणार नाही. तसेच, विकलेल्या वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यालयात होणार नाही. -------------विना नोंदणी क्रमांकाचे वाहन रस्त्यावर चालविण्यास कायद्याने मनाई केली आहे. खरेतर यात ग्राहकांचाच फायदा आहे. नोंदणी क्रमांक नसलेल्या वाहनाचा अपघात झाल्यास संबंधिताला विम्याचे आणि चोरीपासून होणाऱ्या नुकसानीचे संरक्षण मिळत नाही. तसेच, एखाद्या गुन्ह्यात अशा वाहनांचा वापर झाल्यास त्याचा तपास यंत्रणांना शोध घेणे अवघड जाते. या शिवाय असे वाहन वितरीत केल्यास संबंधित वितरकावर परवाना निलंबनाची कारवाई होते. पुन्हा असा गुन्हा केल्यास निलंबन कालावधी वाढविला जातो. त्यामुळे ग्राहक आणि वितरकांनी याचे भान राखले पाहिजे. संजय राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी 

 

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलर