Baramati | बहिणीसोबतचे प्रेम संबंध संपव, म्हणत बारामती शहरात युवकावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 11:12 IST2023-04-24T11:11:36+5:302023-04-24T11:12:15+5:30
जखमी युवकाला सुरुवातीला बारामतीमध्ये व नंतर ससून रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले...

Baramati | बहिणीसोबतचे प्रेम संबंध संपव, म्हणत बारामती शहरात युवकावर जीवघेणा हल्ला
बारामती : शहरातील देशमुख चौक येथे १५ एप्रिल रोजी भर चौकात २१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींना बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. गौरव राकेश वर्मा (वय २१) गणेश सुभाष गरगटे (वय २३, दोघे रा. श्रावण गल्ली) अशी आरोपींची नावे असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की अभिषेक प्रकाश वनवे (वय २१ रा. पतनशहा नगर) या युवकाचे आरोपीच्या बहिणी सोबत असलेले प्रेम संबंध तो संपवित नाही. या कारणासाठी आरोपी गौरव वर्मा व गणेश गरगटे यांनी त्याच्यावर देशमुख चौकात बोलवून घेत त्याच्या पोटात चाकू खुपसून जीवघेणा हल्ला केला. हल्ला केल्यानंतर हे दोन्ही आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले.
जखमी युवकाला सुरुवातीला बारामतीमध्ये व नंतर ससून रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले. बारामती पोलिसांना दवाखान्यामधून खबर मिळाली नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे हलवून खुनाचा प्रयत्न व कट यासारखा गुन्हा दाखल केला. दोन दिवस आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला रक्ताने माखलेला चाकू जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक पोलिस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर करीत आहेत.