शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मृत पूजाच्या लॅपटॉप, मोबाईलशी संबंध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “मृत पूजा चव्हाणचा कोणताही लॅपटॉप किंवा मोबाईल माझ्याकडे नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही,” ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “मृत पूजा चव्हाणचा कोणताही लॅपटॉप किंवा मोबाईल माझ्याकडे नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही,” असे भाजपा नगरसेवक धनराज घोगरे यांनी स्पष्ट केले आहे.

घोगरे यांच्याविरोधात बीडमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर घोगरे यांनी गुरुवारी (दि. ४) पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. वानवडी येथे पूजा चव्हाणचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला, त्या वेळी नगरसेवक घोगरे घटनास्थळी उपस्थित होते.

घोगरे यांनी सांगितले, की वानवडी परिसरात इमारतीवरून उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केल्याचे मला कळाले तसा लोकप्रतिनिधी या नात्याने मी तातडीने त्या ठिकाणी पोहोचलो होतो. तिला उचलून मी रिक्षात ठेवले आणि पोलिसांना पहिला फोन मीच केला. तिचा मोबाईल आणि लॅपटॉप मला माहीत नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या.

घोगरे म्हणाले, “जिथे ही घटना घडली ते ठिकाण माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पोहोचलो. तिचे नाव पूजा आहे हे देखील मला माहीत नव्हते. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेणे हे माझं प्राथमिक कर्तव्य होते.”

चौकट

घोगरेंचा जबाब नाही

पूजासंदर्भातली माहिती आपणच पोलिसांना फोन करून दिली, असे घोगरे उघडपणे सांगत आहेत. पण पोलिसांनी मात्र अजूनही त्यांचा जबाब नोंदविलेला नाही. इतकेच नाही तर अरुण राठोड आणि विलास चव्हाण याव्यतिरिक्त कोणतेही जबाब या प्रकरणी नोंदवले गेलेले नाहीत. घटनास्थळी उपस्थित आणि या घटनेचा महत्त्वाचा साक्षीदार असणाऱ्या व्यक्तीचा जबाब का नोंदवला गेला नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. घोगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “जबाबासंदर्भात पोलिसांकडून मला कोणतीही विचारणा झालेली नाही. त्यांनी संपर्क साधला तर मी जबाब द्यायला तयार आहे.”

चौकट

पोलीस म्हणतात...

वानवडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले “या प्रकरणातल्या महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तपासाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. आवश्यकता भासेल तेव्हा घोगरेंचाही जबाब नोंदवला जाईल.”