शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

उजनीच्या पाणलोट क्षेत्रात आढळला महिलेचा धडावेगळा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 8:11 PM

हात, पाय, मुंडके धारदार शस्त्राने वेगळे करून धड साडीत गुंडाळून फेकून दिल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देहात, पाय, मुंडके धडावेगळे करून महिलेचा खून पोलिसांसमोर अत्यंत वाईट अवस्थेत असणाऱ्या धडाची ओळख पटविण्याचे कठीण आव्हान

भिगवण : उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात भिगवण गावच्या परिसरात अंदाजे २० ते २५ वर्षांच्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आला आहे. हात, पाय, मुंडके धारदार शस्त्राने वेगळे करून धड साडीत गुंडाळून फेकून दिल्याचा प्रकार शनिवारी (दि. ५) सकाळी उघडकीस आला आहे. अत्यंत वाईट अवस्थेत असणाऱ्या धडाची ओळख पटविण्याचे कठीण आव्हान भिगवण पोलिसांसमोर उभे राहिले आहे.शनिवारी (दि. ५) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भिगवण-राशिन रोडवरील जुने गावठाण येथील पुलालगत मासेमारी करण्यासाठी मोहन शिंदे व दत्तू शिंदे दोघे भाऊ गेले असता त्यांना ओढ्याच्या किनाऱ्यालगत साडीत गुंडाळून टाकलेले धड आढळून आले. देहाची जवळून पाहणी केली असता धारदार शस्त्राने कमरेच्याखालील भाग, मुंडके, दंडापासून हात तोडून टाकल्याचे आढळून आल्याने शिंदे यांनी भिगवण पोलिसांना कळविले. मिळालेल्या माहितीच्या आधारे भिगवण पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी जाऊन धड ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच बारामती विभागाचे पोलीस बापू बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत दत्तात्रय शिंदे (रा. भिगवण स्टेशन, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण गाव असल्यामुळे इतर ठिकाणी खून करून मृतदेह टाकण्याचा प्रकार मदनवाडी गावच्या हद्दीत काही वर्षांआड घडला होता. त्याचा तपास पोलिसांनी लावत गुन्हेगारांना गजाआड केले होते. परंतु, या गुन्ह्यात फक्त वाईट अवस्थेत असलेल्या धड  आढळून आल्याने मृतदेहाची ओळख पटवून गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या गुन्ह्याचा तपास विभागीय अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एन. एम. राठोड करीत आहेत.

टॅग्स :BhigwanभिगवणUjine Damउजनी धरणMurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिस