भुगाव येथे तलावामध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 18:27 IST2021-03-11T18:26:57+5:302021-03-11T18:27:43+5:30

हा मृतदेह व्यक्तीचा असून अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे आहे.

The dead body of an unknown person was found in Bhugaon's lake | भुगाव येथे तलावामध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

भुगाव येथे तलावामध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

पिरंगुट : भुगाव परिसरात असणाऱ्या मानस तलावामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी तात्काळ पौड पोलिसांना माहिती दिली. हा मृतदेह व्यक्तीचा असून अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे आहे.  त्याच्या अंगामध्ये आकाशी रंगाचा शर्ट आहे व त्यावरती गॅलक्सी सिक्युरिटी असे नाव दिलेले आहे. अद्याप या मयताची ओळख पटलेली नाही. 

अनिता रावळकर आणि सुनील मगर हे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. मुळशी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमोद बलकवडे व त्यांच्या टीमने मृतदेह काढला. मृतदेहाबद्दल काही माहिती असल्यास त्वरित पौड पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन पौड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. या घटनेचा तपास पौड पोलीस हे करत आहेत. 

Web Title: The dead body of an unknown person was found in Bhugaon's lake