खेड तालुक्यातील राजगुनगरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; ७२ हजारांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 15:56 IST2021-08-05T15:56:04+5:302021-08-05T15:56:33+5:30
सोन्याची कर्णफुले, सोन्याचे मण्यांमध्ये विनलेली मनगटी, सोन्याच्या अंगठया, गळयातील ओम आकाराचे सोन्याच

खेड तालुक्यातील राजगुनगरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; ७२ हजारांचे दागिने लंपास
राजगुरूनगर : राजगुरुनगर येथे दिवसाढवळ्या घराचा कडी - कोंयडा तोडून सुमारे ७२ हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने लंपास झाल्याची घटना घडली आहे. याबाबत प्रकाष सुभाष सोनार, (रा. गौरी शंकर कॉलनी, वाडा रोड) यांनी अज्ञात चोरट्याविरूध खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
४ तारखेला भरदुपारी अज्ञात चोरट्याने घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन कपाटाचा दरवाजा उघडून कानातील सोन्याची कर्णफुले, अंगठी, सोन्याचे मण्यांमध्ये विनलेली मनगटी, सोन्याच्या अंगठया, गळयातील ओम आकाराचे सोन्याचे पान, सोन्याचे कानातील किल्लु, पायातील जोडवी असा एकुण ७२ हजार पाचशे रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करुन चोरुन नेले. पुढील तपास खेड पोलिस करित आहे.