VIDEO | पुण्यात सराफी व्यवसायिकावर भरदिवसा हल्ला; CCTV मध्ये थरार कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 17:07 IST2022-05-20T17:00:39+5:302022-05-20T17:07:24+5:30
चोरट्यांचा शोध घेण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांकडून पथके तयार...

VIDEO | पुण्यात सराफी व्यवसायिकावर भरदिवसा हल्ला; CCTV मध्ये थरार कैद
धनकवडी : सराफी व्यावसायिकावर चाकुने हल्ला करून भरदिवसा दरोडा टाकण्याच्या प्रयत्न दत्तनगर जांभुळवाडी मार्गावरील दुकानात घटला, या हल्ल्यात सराफ जखमी झाला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली आहेत.
चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात सराफ विनोदकुमार भागचंद साेनी (वय ४२, रा. आंबेगाव बुद्रुक) जखमी झाले आहेत. सोनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोनी यांचे आंबेगाव बुद्रुक परिसरात वैभवलक्ष्मी ज्वेलर्स सराफी पेढी आहे. सराफी दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्यांनी अचानक सोनी यांच्यावर चाकुने हल्ला चढविला सोनी यांनी प्रसंगावधान राखून आरडा ओरडा केला. सोनी यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोरटे सराफी पेढीसमोर लावलेल्या वाहनातून पसार झाले.
पुण्यात सराफी व्यवसायिकावर भरदिवसा हल्ला, सीसीटीव्हीत थरार कैद#crime#Punepic.twitter.com/eot2YdKTDN
— Lokmat (@lokmat) May 20, 2022
या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सराफी पेढीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरट्यांनी पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.