शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Demu Train Fire: रेल्वेच्या डब्यातील टॉयलेटमधे आग; एक व्यक्ती अडकला, आरडाओरडा केला अन् प्रवाशांना कळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:36 IST

Daund Pune Demu Train Fire काही विचित्र घटना घडू नये म्हणून काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडून त्या व्यक्तीला बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचला

पुणे: मुंब्रा रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच पुण्यामध्ये रेल्वे अपघाताची एक घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये धावत्या रेल्वेमध्ये आग लागल्याची घटना घडली. दौंड पुणे डेमो ट्रेनमध्ये अचानक आग लागली. ट्रेनला आग लागल्याचं लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. (Daund Pune Demu Train Fire) 

दौंडमधून दररोज सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी ही गाडी सुटते. नेहमीप्रमाणे ही आज सकाळी पुण्याच्या दिशेने निघाली. पण अचानक रेल्वेच्या एका डब्यात आग लागली आणि गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, दौंड - पुणे रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या शटल डेमो ट्रेनमध्ये अचानक आग लागली. या ट्रेनला अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. जीव वाचविण्यासाठी प्रवासी इकडे तिकडे धावले. किंकाळ्या, आरडाओरडा अन सर्वांची पळापळ झाली.

इंजिन पासून तिसऱ्या बोगीत आग लागली होती. आग लागल्याचं कळताच ट्रेन थांबवण्यात आली. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. पण या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते.  पुणे विभागातील दौंड एक मुख्य स्थानक आहे. दौंडहून पुण्याकडे जाण्यासाठी सकाळी ही शटल डेमो आहे. आणि आज सोमवार पहिलाच दिवस कामाचा असल्या कारणाने दौंडहून पुण्याकडे जाणारी ही प्रचंड गर्दी असते. या गाडीमध्ये दैनंदिन प्रवासी असतात. 

त्या व्यक्तीला बाहेर काढलं अन् त्याच जीव वाचला 

दरम्यान दौंडवरून सुटून पुण्याला येत असताना ट्रेनच्या तिसऱ्या बोगीत टॉयलेट मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या टॉयलेट मध्ये एक व्यक्ती अडकून राहिला होता. दरवाजा लॉक झाल्यामुळे दरवाजा उघडता येत नव्हता. या व्यक्तीने आरडाओरडा केल्याने इतर प्रवाशांच्या लक्षात आलं. या डब्यामध्ये धूर देखील पसरला होता. त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले होते. काही विचित्र घटना घडू नये म्हणून काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडून त्या व्यक्तीला बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचला.

गेल्या आठ दहा दिवसात अनेक अशा घटना घडतायेत की प्रवाशांच्या जीवाशी खेळ चाललाय. रेल्वे प्रशासनाला नम्र विनंती आहे की, याची सखोल चौकशी करावी आणि काय घटना घडली याचं नेमकं कारण शोधून काढावं अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.  मात्र या घटनेमुळे ट्रेनच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून याची चौकशी केली जाणार आहे. त्यामध्ये दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीfireआगPoliceपोलिसAccidentअपघातTrain Accidentरेल्वे अपघात