दौंड : दौंड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ अ च्या एका जागेसाठी बुधवार (दि. १०) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी कुठलाही उमेदवार माघार घेणार नाही, त्यामुळे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नीलप्रसाद चव्हाण आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अवधूत तावडे यांनी संयुक्तरित्या दिली.
या एक जागेसाठी शनिवार (दि. २०) रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ॲड. शीतल मोरे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार), शुभांगी घुले (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार), आणि रेणुका थोरात (नागरिकित संरक्षण मंडळ आणि मित्र पक्ष) हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या प्रभागातील उमेदवार रेणुका थोरात यांनी छाननीच्या वेळी जात प्रमाणपत्र दाखल केले नव्हते, मात्र त्यांचा अर्ज वैध ठरला होता. यावर शुभांगी घुले यांनी अपील दाखल केली होती, पण त्यांचा अपील फेटाळण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक ९ अ ची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती, तसेच आता शनिवारी (दि. २०) ही निवडणूक होणार आहे.
Web Summary : Three candidates, representing NCP factions and allies, will contest Daund Nagar Parishad Ward 9A election on Saturday. An appeal against a candidate's validation was rejected. Voting is scheduled from 7:30 AM to 5:30 PM.
Web Summary : दौंड नगर परिषद वार्ड 9ए के चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस और सहयोगी दलों के तीन उम्मीदवार शनिवार को प्रतिस्पर्धा करेंगे। एक उम्मीदवार के सत्यापन के खिलाफ अपील खारिज कर दी गई। मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक होगा।