दौैंडचे पाच गुन्हेगार तडीपार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:37 PM2018-04-05T18:37:53+5:302018-04-05T18:37:53+5:30

तडीपार करण्यात आलेल्या पाच जणांवर लुटमार, रेल्वेत लुटमार, जबरी चोरी, मारहाण, इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

daund Five Criminals Bridle | दौैंडचे पाच गुन्हेगार तडीपार 

दौैंडचे पाच गुन्हेगार तडीपार 

Next
ठळक मुद्देतडीपार झालेल्यांपैकी त्यागराज रणदिवे हा सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात

दौैंड : दौंड येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.  या गुंडांना पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. त्यागी रणदिवे (वय २५, रा. सिध्दार्थनगर, दौंड), अशोक सोनवणे (वय ३५, रा. भीमनगर, दौंड), अर्जून गायकवाड (रा. ३७, रा. सिध्दार्थनगर, दौंड), नीलेश कदम (वय २५ , रा. स्तंभाजवळ, सिध्दार्थनगर, दौंड) व अमोल ढवळे (वय ३१,  रा. गॅरेला हायस्कूल मागे, भीमनगर, दौंड) हे तडीपार केलेले पाच गुन्हेगार आहेत.  
या पाच जणांवर लुटमार, रेल्वेत लुटमार, जबरी चोरी, मारहाण, इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तडीपार झालेल्यांपैकी त्यागराज रणदिवे हा सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. तर अशोक सोनवणे आणि अमोल ढवळे यांना आज पुणे जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यात आले. अर्जून गायकवाड व नीलेश कदम फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे. सहायक फौजदार दिलीप भाकरे यांच्यासह पोलीस हवालदार सचिन बोराडे व बाळासाहेब चोरमले यांनी या कारवाईत भाग घेतला.

Web Title: daund Five Criminals Bridle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.