शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दरडी काढण्याचे काम संथगतीने

By admin | Updated: July 28, 2015 00:42 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील धोकादायक दरडी काढण्याचे सुरू करण्यात आलेले काम संथ गतीने सुरू असल्याने काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील धोकादायक दरडी काढण्याचे सुरू करण्यात आलेले काम संथ गतीने सुरू असल्याने काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. काम सुरू असल्यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक जुन्या मार्गावर वळविली जात असल्याने होत असलेली वाहतूककोंडी सोमवारीही कायम होती. दरम्यान, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.खंडाळा व आडोशी बोगद्याजवळ दरडी कोसळल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने धोकादायक दरडी हटविण्याचे काम २४ जुलैपासून सुरू केले आहे. हे काम १० दिवसांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असला, तरी काम संथ गतीने सुरू आहे. आंध्र प्रदेशातील मेटाफेरी या कंपनीचे १४ जणांचे विशेष पथक धोकादायक दरडी व सैल झालेले दगड काढण्याचे काम करत आहे. त्यांना स्पेन येथील चार तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत. शिवाय, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अनेक वरिष्ठ अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करत आहेत. आयआरबीचे अनेक कर्मचारी व यंत्रणा या कामात गुंतली आहे. मात्र, कामाची प्रगती संथ आहे.दरडी काढण्याचे काम सुरू असताना एक्स्प्रेस वेवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात येत आहे. हा रस्ता अरुंद असल्याने गेले चार दिवस प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. याचा फटका मुंबई व पुणे या दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना बसत आहे. शिवाय, स्थानिकांनाही वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असल्याने सदर काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. काम सुरू असताना उडालेला दगड लागून आयआरबीचा एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली असून, जखमी कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामाच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडत असल्याने काम करताना अडचणी येत आहेत. शिवाय, पावसामुळे तयार होणारे धुकेही कामात अडथळा आणत आहे.जुन्या दिवसांची आठवण-पूर्वी मुंबई व पुण्याला जाणारी वाहने बोर घाटातील अवघड टप्पे पार करत मार्गस्थ होत होती. बोर घाटात एखादे वाहन बंद पडले, तर वाहनांच्या लांबलचक रांगा लागत होत्या. एक्सप्रेस वेची निर्मिती झाल्यानंतर मात्र तुरळक वाहनेच जुन्या मार्गाने जात होती. गेल्या चार दिवसांपासून लोणावळेकर,खोपोलीकर जुने दिवस आठवू लागले आहेत. बोर घाटाचा अवघड टप्पा पार करताना अनेक वाहने बंद पडत असल्याने वाहनांची दुरुस्ती करणाऱ्या फिटर्सना चांगले दिवस आले आहेत. शिवाय, मके, चिक्की, काकडी, वडापाव, पाण्याच्या बाटल्या व अन्य वस्तूंची विक्री करताना अनेक तरुण जुन्या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपण १५ वर्षे मागे गेल्याची प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ व्यक्त करताना दिसत आहेत.