दर्शना पवार खून प्रकरण: राहुल हांडोरेची रवानगी येरवडा कारागृहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 10:02 IST2023-07-04T10:01:35+5:302023-07-04T10:02:09+5:30

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते....

Darshana Pawar murder case: Rahul Handore sent to Yerawada Jail | दर्शना पवार खून प्रकरण: राहुल हांडोरेची रवानगी येरवडा कारागृहात

दर्शना पवार खून प्रकरण: राहुल हांडोरेची रवानगी येरवडा कारागृहात

पुणे : एमपीएससी परीक्षा पास झालेल्या दर्शना पवारचा रायगडाच्या पायथ्याशी खून केल्या प्रकरणात अटक झालेल्या राहुल हांडोरे याची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते.

दि. १८ जून रोजी दर्शना पवार हिचा राजगडच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. त्यानंतर मित्र हांडोरे यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर सुरुवातीला पोलिस कोठडी, आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपीच्या वतीने ॲड. गणेश माने यांनी काम पाहिले.

Web Title: Darshana Pawar murder case: Rahul Handore sent to Yerawada Jail