शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

धाडसाने चोरटे पकडले, पण ३७ वर्षांनी फिर्यादच मागे घेतली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 4:45 AM

लोकअदालतीत असाही न्याय; महिलेचे न्यायालयाचे खेटे वाचले

पुणे : तब्बल ३७ वर्षांपूर्वी सोन्याची साखळी चोेरणाऱ्या चोरट्यांना महिलेने धाडसाने पकडले. मात्र, जामीन मिळाल्याने आरोपी फरार झाले आणि फिर्यादी महिलेलाच न्यायालयात खेटे घालण्याची वेळ आली. त्यामुळे लोकअदालतीत गुन्हा मागे घेण्यात आला.प्रवासादरम्यान ९०० रुपये किमतीची सोन्याची पोत चोरीला गेल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेला गुन्ह्याची फिर्याद तब्बल ३७ वर्षांनी मागे घेतला. शनिवारी लोकन्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांच्या न्यायालयाने हे प्रकरण मिटवले. लक्ष्मीबाई सरडे (घटनेच्या दिवशीचे वय ३०, रा. सरडे वस्ती, लोणीकंद) या १७ जानेवारी १९८१ रोजी त्यांच्या आई मंजूबाई बबन राकसे व गावातील दोन महिलांसह भोसरी येथे राहणाºया त्यांच्या बहिणीकडे निघाल्या होत्या. येरवड्यात पीएमपीच्या स्टॉपवरून भोसरीसाठी बस पकडली. या प्रवासादरम्यान बसमध्ये गर्दी असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९०० रुपये किमतीची सोन्याची पोत चोरली. चोरी होत असताना सरडे यांना गळ्याजवळ कोणाचा तरी हात असल्याचे लक्षात आले होते. बस काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांना गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी आईच्या मदतीने त्वरित संशय असलेल्या तीन व्यक्तींना पकडले. या प्रकरणात सरडे यांनी तक्रार दिली होती.फिर्यादीनुसार बादल सुंदर गागडे, विकास गुलचंद बागडे आणि सुरेश प्रसाद भाट (सर्व रा. सर्व्हे नंबर ८, येरवडा) यांना येरवडा पोलिसांनी या प्रकरणात अटक केली होती. त्यानुसार त्याचा तपास करून त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर ते फरार झाले आहेत. अद्याप ते हाती न आल्याने हागुन्हा प्रलंबित होता. त्यामुळे फिर्यादी यांनी तब्बल ३७ वर्षांनी हा गुन्हा लोक अदालतीमध्ये मागे घेतला. त्यामुळे हा खटला निकाली लागला. फिर्यादी यांना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे आणि रवींद्र कांबळे यांनी प्रयत्न केले.व्यवसायिकाच्या कुटुंबियांना ४५ लाखांची नुकसानभरपाईअपघातात मृत्यू झालेल्या फरशी बसविणा-या ठेकेदाराच्या कुटुंबियांना तब्बल ४५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. लोकअदालतीमध्ये तडजोडीअंती ही रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. अमरजित रामनरेश सिंग असे अपघातात मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. त्यांची पत्नी, दोन मुले, आई-वडिलांनी अ‍ॅड. अनिल पटणी आणि अ‍ॅड. आशिष पटणी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता.

समन्समुळे मुलाने बोलणे सोडलेगुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. खटल्याच्या संदर्भात एक दिवस फिर्यादी समन्स पाठविला होता. तो त्यांच्या मुलाच्या हाती लागला. न्यायालयातून समन्स आल्याचे पाहून तो फिर्यादीवरच चिडला. न्यायालयाची नोटीस आली म्हणजे आपल्या आईने काहीतरी चुकीचे काम केले, अशी भावना त्याचा मनात निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने फिर्यादीबरोबर बोलणेच सोडून दिले होते, अशी माहिती सरकारी वकील वामन कोळी यांनी दिली. या प्रकारामुळे आजही न्यायालयीन कामकाजाबाबत भीती असल्याचे पुढे येते, असे कोळी म्हणाले. 

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे