शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

घाटाकडील तीव्र उतार धोकादायक

By admin | Updated: June 11, 2015 06:10 IST

बोपखेल रहिवाशांसाठी मुळा नदीवरील तरंगता पूल खुला करून४ दिवस झाले आहेत. पावसामुळे खराब झालेले खडकीकडील जोड मार्गावरील

मिलिंद कांबळे, पिंपरीबोपखेल रहिवाशांसाठी मुळा नदीवरील तरंगता पूल खुला करून४ दिवस झाले आहेत. पावसामुळे खराब झालेले खडकीकडील जोड मार्गावरील मातीचे रस्ते दुरुस्ती काम सीएमईच्या लष्करी जवान करीत आहेत. बोपखेल घाटाच्या जोडरस्ताच्या तीव्र उतारामुळे वाहने घसरून अपघात होण्याचा धोका आहे. बोपखेलच्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी जवळचा पर्यायी मार्ग म्हणून तरंगता पूल गेल्या रविवारी (दि. ७) खुला करण्यात आला. सीएमईच्या जवानांनी हा पूल तयार केला आहे. यावरून नागरिकांनी ये-जा सुरू केली आहे. तसेच, दुचाकी, रिक्षा, टेम्पो, मोटार आदी वाहनांची वाहतूक केली जात आहे. खडकीच्या ५१२ आर्मी बेसवर्कशॉपच्या बाजूने माती असल्याने पावसामुळे चिखल झाल्याने खड्डे पडले होते. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांची गैरसोय होत होती. तसेच, येथे प्रकाश व्यवस्था नसल्याने संध्याकाळनंतर हा परिसर असुरक्षित वाटतो. विशेषत: महिलांना ये-जा करण्यास भीती वाटते. बोपखेलच्या बाजूने जोडलेल्या पुलापेक्षा घाटाची उंची अधिक आहे. याच स्थितीत तरंगता पूल आणि घाट जोडला आहे. यासाठी तयार केलेला रस्ता कच्चा आहे. या तीव्र उतारामुळे वाहने घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषत: दुचाकी आणि प्रवाशांनी भरलेली रिक्षा,अधिक वजनाच्या वाहनावरील नियंत्रण सुटून दुर्घटना घडण्याची भीती आहे. पुलास हा रस्ता मातीने जोडल्याने तो अद्याप कच्चा मार्ग आहे. यामुळे रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे. वाहनांच्या चाकामुळे ही खड्डी आजूबाजूस जोरात उडत असल्याने शेजारून जाणारी एखादी व्यक्ती जखमी होण्याची शक्यता आहे.तसेच, पुलाचा पृष्ठभाग लोखंडी आहे. तो खूपच गुळगुळीत आहे. त्यामुळे वाहन घसरून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात पाणी आणि चिखलामुळे पूल अधिक निसरडा होतो. या निसरड्या पुलावरून विशेषत: दुचाकी वाहने घसरण्याची अधिक शक्यता आहे. तसेच, पुलाच्या बाजूने सुरक्षा कठडे नाहीत. केवळ दोरी बांधली आहे. पुलावरुन ये- जा करताना नदी पात्रात डोकावणारे लहान मुले पाण्यात पडू शकतात. नियंत्रण सुटलेले वाहन थेट पाण्यात पडू शकते. पुलाची रुंदी कमी असल्याने रिक्षा, टेम्पो, मोटार येत असले, तर दुसऱ्या बाजूची वाहने थांबविली जातात. मर्यादित वेगात वाहन येथून नेता येते. जड वाहनांना बंदीया पुलावरून दुचाकी, रिक्षा, टेम्पो आणि मोटार याच वाहनांना प्रवेश दिला जात आहे. अधिक वजनाच्या वाहनास प्रवेश नाही.