पुण्यातील सिंहगड पायथ्याच्या हॉटेलमध्ये डान्स पार्टी; ११ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 06:20 PM2021-07-25T18:20:14+5:302021-07-25T18:24:57+5:30

सिंहगड पायथ्याजवळील गोळेवाडी येथील हॉटेल सानवी रिसाेर्टमध्ये हॉटेल मालक विनय कांबळे आणि त्यांच्या डॉक्टर मित्राने यांनी आपल्या हॉटेलमधील दोन रुममध्ये डान्स पार्टी आयोजित केली असल्याची माहिती पोलिसांनी होती.

Dance party at Sinhagad foothills hotel in Pune; Crimes filed against 11 persons | पुण्यातील सिंहगड पायथ्याच्या हॉटेलमध्ये डान्स पार्टी; ११ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील सिंहगड पायथ्याच्या हॉटेलमध्ये डान्स पार्टी; ११ जणांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देपार्टीतले सर्वजण होते विनामास्क कोविड नियमाचे भंग केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत गर्दी जमवून सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील हॉटेल सानवी रिसोर्टमध्ये पार्टीचे आयोजन करुन महिलासोबत डान्स करणाऱ्या एका डॉक्टरासह ११ जणांवर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे.

हॉटेलमाल विनय सुभाष कांबळे (वय ३२, रा. आकाशनगर, वारजे), संदीप शंकर कोतवाल (वय ४७, रा. हिंगणमळा, हडपसर), सचिन विठ्ठल शिंदे (वय ३८, रा. आनंदनगर, सिंहगड रोड), कालीदास शशिराव काकडे (वय ५०, रा. हडपसर), विठ्ठल विजय माेरे (वय ४३, रा. हडपसर), राजेश बलभिम वाघमारे (वय ४५, रा. हडपसर) व इतर ४ महिला अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. डॉ. निखिल भाकरे हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

सिंहगड पायथ्याजवळील गोळेवाडी येथील हॉटेल सानवी रिसाेर्टमध्ये हॉटेल मालक विनय कांबळे आणि त्यांचा मित्र डॉ. निखिल भाकरे (रा. भाकरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आंबेगाव) यांनी आपल्या हॉटेलमधील दोन रुममध्ये डान्स पार्टी आयोजित केली असल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी सायंकाळी मिळाली.

सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. तेव्हा तेथे एल ई डी लाईट लावत साऊंड सिस्टीमवर गाणी लावून अनेक जण नाच करताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना पकडून हवेली पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याविरुद्ध कोविड नियमाचे भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Dance party at Sinhagad foothills hotel in Pune; Crimes filed against 11 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.