शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

धरणं भरली! नद्यांना पूर, खडकवासलातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 00:15 IST

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असून बहुतांश धरणं भरली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने नद्यांना पूर आला आहे. मुळा, मुठा, भीमा व घोड नदीपात्राला पूर आला होता.

पुणे - धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असून बहुतांश धरणं भरली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने नद्यांना पूर आला आहे. मुळा, मुठा, भीमा व घोड नदीपात्राला पूर आला होता. बहुतांश धरणांचे पाणी उजनी धरणात जमा होते. परिणामी उजनीतील उपयुक्त पाणीसाठा २४.४८ टीएमसीवर (४५.७० टक्के) पोहोचला आहे.खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव आणि खडकवासला ही धरणे शंभर टक्के भरल्याने तिनही धरणांतून शुक्रवारीही दिवसभर पाणी सोडण्यात येत होते. परिणामी खडकवासला धरणातून सायंकाळी पाचपर्यंत १८ हजार ४९१ क्युसेक्सने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. परिणामी धरण क्षेत्रासह शहरातही पावसाचा जोर नसताना मुठा नदी पुन्हा दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र शहरात दिसत होते. वाहती नदी पाहण्यासाठी पुणेकरांनी नदीवरील पूल आणि नदीकाठाला गर्दी केली होती.खडकवासला प्रकल्पातील पानशेत आणि वरसगावला शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येकी २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. टेमघरला १६ मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासला धरणात १.९७, पानशेत १०.६५ आणि वरसगावला १२.८२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे.ही तिन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर, या साखळीतील टेमघर धरणात २.१७ टीएमसी (५८.६० टक्के) पाणीसाठा आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांतील पाणीसाठा २७.६२ टीएमसी (९४.७४ टक्के) झाला आहे. वरसगाव धरणातून ८ हजार ५३५ आणि पानशेतमधून ३ हजार ९०८ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.पुढे खडकवासल्यातून देखील शुक्रवारी पहाटेपासूनच मुठा नदीत पाणी सोडण्यात येत होते. सायंकाळी पाचपर्यंत १८ हजार ४९१ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत होते. परिणामी मुठा नदी दुथडी भरून वाहत होती.दौंड तालुक्यात मुळा मुठेला पूरकेडगाव : दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा व भीमा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेले दोन दिवस पुणे परिसरात संततधार पाऊस झाल्याने खडकवासला प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे मुळा मुठा नदीची पाणीपातळी वाढली आहे.दुपारी ४ वाजता खडकवासला प्रकल्पातून १८ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी रात्री पाणीपातळी वाढणार, याचा अंदाज घेत अनेक शेतकऱ्यांनी आपले विद्युतपंप काढून ठेवले. दौंड तालुक्यातील उंडवडी, राहू, पिंपळगाव, देलवडी, पारगाव, नानगाव, हातवळण, कानगाव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यातील पवना धरणक्षेत्रात २६, मुळशी ११, पिंपळगाव जोगे ८, भामा असखेड १, नीरा देवघर १३ आणि गुंजवणीला ४ मिलिमीटर पाऊस झाला. पवना धरणात ८.५१, मुळशी १८.४१, पिंपळगाव जोगे १.०४, भामा आसखेड ७.३६, नीरा देवघर ११.७३, गुंजवणी २.९२, वीर ९.४१ आणि भाटघर धरणात २३.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.बंधारे, शेतीचे मोठे नुकसानघोडेगाव : डिंभे धरणातून सोडण्यात आलेल्या १७६०० क्युसेक्स पाण्यामुळे घोड नदीवरील बंधारे, नदीकाठची शेती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये घोडेगावजवळील गोनवडीच्या बंधाºयाचे जास्त नुकसान झाले असून लोखंडी रेलिंग व बाजूचा रस्ता पूर्ण वाहून गेला आहे.गुरुवारी (दि. १६) सकाळी ११ नंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे डिंभे धरणातून पाच गेटद्वारे सुरुवातीला २८५०, नंतर ७६००, १३६००, १७६०० क्युसेक्स पाणी सोडावे लागले. त्यामुळे घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, नदीकाठची शेती प्रभावित झाली, तसेच मोटारी वाहून गेल्या.यामध्ये सर्वात जास्त नुकसान घोडेगावजवळील गोनवडीच्या बंधाºयाचे झाले. बंधाºयाचे लोखंडी कठडे तुटल्याने व बाजूचा भराववाहून गेला. त्यामुळे यावरील वाहतूक बंद झाली. हा बंधारा १९९५ मध्ये ५५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला असून याची लांबी १००मीटर आहे.दरम्यान, आज (दि. १७) या बंधाºयाची पाहणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे-पाटील यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली व ग्रामस्थांची भेट घेतली.पूल सुमारे १४ तास पुराच्या पाण्याखालीलाखणगाव (ता.आंबेगाव) येथील घोडनदीवरील पूल सुमारे १४ तास पुराच्या पाण्याखाली होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शुक्रवारी दुपारी ३ नंतर पाणी ओसरले.अचानक आलेल्या पुरामुळे घोडनदी काठावरील शेतकºयांचे वीजपंप पाण्यात गेले आहेत. हे वीजपंप बाहेर काढण्याची धडपड शेतकरी आज करत होते.1गोनवडीच्या बंधाºयावरून आमोंडी, कोलदरा, आयटीआयकडे जाणारे विद्यार्थी यांची सतत वर्दळ असते. यासाठी पाटबंधारे विभागाने तत्काळ रेलिंग उभे करून द्यावे व वाहून गेलेला भराव भरून वाहतूक सुरू करून द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष मंडलिक यांनी केली आहे.2खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डिंभे धरणावर जाऊन पाहणी केली. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याची अडचण जाणवणार नसल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.कळमोडी पुन्हा भरले...चासकमान : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मध्यंतरी पावसाच्या हलक्या सरी वगळता पावसाने दडी मारली होती. परंतु मागील तीन दिवसांपासून सह्याद्रीच्या डोंगररांगावर विशेषत: भीमाशंकर अभयारण्य परिसरात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने खेडसह आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारला नंदनवन ठरलेले कळमोडी धरण पुन्हा १०० टक्के भरले.मागील महिन्यात खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सतत मोठ्या प्रमाणात पडणाºया पावसाने पश्चिम भागातील अनेक गावांतील ओढे नाले खळाळून वाहू लागले असल्याने कळमोळी धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने ११ जुलै रोजी भरून धरणाच्या आठही स्वयंचलित दरवाजाद्वारे पाणी सोडण्यात आले होते.आता पुन्हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने कळमोडी धरणाच्या खालील बाजूस असलेले आरळा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. सर्व पाणी भीमा नदीद्वारे चासकमान धरणात वाहून जात भीमा नदीने रौद्र रूप धारण केले आहे. धरण परिसरात सरासरी एकूण ५०३ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.चासकमान धरणाचे पाचही दरवाजे उघडून सांडव्याद्वारे ४५९८ क्युसेक वेगाने विसर्ग सोडून भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ५७५ तर कालव्याद्वारे नदीपात्रात २७५ क्युसेकने सोडण्यात आले आले. भीमा नदीवरी पूल पाण्याखाली जाऊन चास-कडूस या दोन गावांचा संपर्क तुटला असल्याने पयार्याने नागरिकांना १५-२० किलोमीटर अंतर कापून आदी गावांमध्ये जावे लागत आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीfloodपूर