शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागात १ लाख ३६ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:27 IST

येत्या पाच दिवसांत पिकांचे पंचनामे करण्याची व प्राप्त अहवालानुसार शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांची माहिती : पंचनाम्याचे काम वेगाने सुरूअवकाळी पावसामुळे पुणे विभागातील विविध ठिकाणच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान पुणे विभागात आजअखेर सरासरी १३७.२४ टक्के इतका पाऊस

पुणे : अवकाळी पावसामुळे पुणे विभागात सुमारे १ लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यात सोयाबीन, भात, ज्वारी, द्र्राक्षबागा आदींचा समावेश आहे. येत्या पाच दिवसांत पिकांचे पंचनामे करण्याची व प्राप्त अहवालानुसार शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रविवारी दिली़.अवकाळी पावसामुळे पुणे विभागातील विविध ठिकाणच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, स्वत: विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी दोन दिवस सोलापूर व सांगली जिल्ह्याचा दौरा केला आहे. तसेच, नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. तसेच, विभागात झालेल्या अतिवृष्टी आणि नुकसानाबाबत माहिती रविवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितली. याप्रसंगी म्हैसेकर म्हणाले, की विभागामधील सांगलीत ६५ हजार २६७ हेक्टर, सोलापुरात ३६ हजार ३४५ हेक्टर, पुणे जिल्ह्यात २१ हजार ६८१ हेक्टर, सातारा जिल्ह्यात ११ हजार ८०० हेक्टर व कोल्हापूर जिल्ह्यात १ हजार ५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातही प्रामुख्याने सोयाबीन, भात, ज्वारी, द्र्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला विमा कंपनी किंवा शासनाकडून मदत केली जाणार आहे. याकरिता सर्व विमा कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आहे, असेही म्हैसेकर यांनी नमूद केले.......पावसामुळे ५१ तालुके बाधितअवकाळी पावसामुळे पुणे विभागातील ५१ तालुके बाधित असून, विभागातील १ लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे नमूद करून म्हैसेकर म्हणाले, विभागातील सर्वच भागांतील पंचनामे करण्याचे काम सुरू असून, पुन्हा पाऊस आला नाही तर येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत पंचनाम्याचे काम पूर्ण होईल. पंचनाम्यासाठी जिओ टॅगिंग फोटो काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या माध्यमातून पंचनामे केले जात आहेत. ज्या पिकाचा विमा काढण्यात आलेला आहे, त्याबाबतची वेगळी माहिती घेऊन संबंधित शेतकºयांचे पंचनामे करून घेतले जात आहेत...........विभागातील पाऊस पुणे विभागात आजअखेर सरासरी १३७.२४ टक्के इतका पाऊस झाला असून, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक १८२.५ टक्के पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात १५८.५ टक्के, सातारा जिल्ह्यात १७०.८६ टक्के, सोलापूर जिल्ह्यात ९१.७५ टक्के, तर कोल्हापूर जिल्ह्यात १२०.२४ टक्के इतका पाऊस झाला असल्याचेही डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरी