शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

बीडचे वातावरण दादाच बदलतील; अजितदादांच्या पालकमंत्रिपदाचा पुण्यात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:20 IST

पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रकल्पांना गती मिळून विकास होईल, दादांची कार्यक्षमता अफाट आहे

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवारपुणेबीड अशा दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री झाले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुण्यात सोमवारी जल्लोष केला. पक्षाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनासाठी शिर्डी मुक्कामी असलेले कार्यकर्ते आज परतले व पक्ष कार्यालयासमोर त्यांनी ढोल-ताशे वाजवत आनंद व्यक्त केला.

शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक दत्ता सागरे, रूपाली ढोंबले व अन्य अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. गुप्ते मंगल कार्यालयाजवळच्या पक्ष कार्यालयासमोरच एकत्र जमून सर्वांनी जल्लोष केला. एकमेकांना जिलेबी, पेढे भरविण्यात आले. मानकर यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्याच्या व शहराच्याही विकासासाठी ही मोठी गोष्ट आहे. दादांची कार्यक्षमता अफाट आहे. त्यामुळे आता इथल्या अनेक मोठ्या प्रकल्पांना गती मिळेल. दादा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आर्थिक कारणावरून इथली कामे अडणार नाहीतच, पण अशा मोठ्या कामांना प्रशासकीय गती देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते, ती दादांकडे भरपूर आहे. त्याशिवाय आता पुण्यात काही नवे प्रकल्पही येतील, असे मानकर म्हणाले.

कार्याध्यक्ष देशमुख यांनी दादांकडे दुहेरी जबाबदारी आली. यावरूनच त्यांची कार्यक्षमता सिद्ध होते, असे सांगितले. बीडमधील वातावरण दादा नक्कीच चांगले करतील, तेथील जनतेला विश्वास देतील, अशी खात्री देशमुख यांनी व्यक्त केली. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पुण्यात येतील त्यावेळी त्यांचे असेच जल्लोषात स्वागत करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसSocialसामाजिकMahayutiमहायुती