पूरग्रस्त लोकांना मदत करून दाभोलकरांची आठवण जागवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 17:02 IST2019-08-16T16:56:23+5:302019-08-16T17:02:43+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त या दोन्ही जिल्हयांमधील पूरग्रस्त लोकांना मदत करून सकारात्मक पद्धतीने जागवली जाणार आहे...

पूरग्रस्त लोकांना मदत करून दाभोलकरांची आठवण जागवणार
पुणे : कोल्हापूर, सांगलीसारख्या भागांमध्ये पुराने हाहाकार उडविल्याने अनेकांचे संसार बेचिराख झाले. राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील खारीचा वाटा उचलण्याचे ठरविले असून, येत्या 20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त या दोन्ही जिल्हयांमधील पूरग्रस्त लोकांना मदत करून सकारात्मक पद्धतीने जागवली जाणार आहे.
डॉ. दाभोलकरांच्या खुनाचे सूत्रधार सापडले नसले तरी त्याचा निषेध करण्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पूरग्रस्तांच्या मदतीद्वारे दाभोलकरांच्या आठवणी जागविण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे हमीद दाभोलकर यांनी सांगितले.
कधी पकडणार? जबाब दो आंदोलन करणार
ज्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. दाभोलकरांना गोळ्या झाडण्यात आल्या. त्या ठिकाणी दि.१९ ऑगस्टला ह्यकँण्डल मार्चह्ण द्वारे त्यांना अभिवादन केले जाणार आहे तर दि. २० ऑगस्टला सकाळी ९ वाजता सूत्रधार कधी पकडणार? जबाब दो आंदोलन केले जाणार आहे. याच दिवशी सायंकाळी ५. ३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे द हिंदू चे संपादक एन.राम यांचे वर्तमान भारतासमोरील तीन आव्हाने विवेकावरील हल्ला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने आणि जनसमुहांच्या वंचिततेचे वास्तवयाविषयावर स्मृतिव्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले असणार आहेत.
पुस्तक प्रकाशन सोहळा
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या प्रश्न तुमचा आणि उत्तर दाभोलकरांचे आणि ठरलं डोळस व्हायचं या दोन पुस्तकांच्या राजकमल प्रकाशनामार्फत प्रसिद्ध होणा-या हिंदी अनुवादांचे लोकार्पण होणार आहे. तसेच विवेकाचा आवाज या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दहा भाषणांचे शब्दांकन केलेले पुस्तक साधना प्रकाशनमार्फत प्रकाशित केले जाणार आहे.