शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेला तब्बल १२ लाखांना लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 3:49 PM

पुणे : लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी गमावण्याची पाळी आली आहे. नोकऱ्याही घटल्या आहेत. त्यामुळे एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळत असेल ...

ठळक मुद्देयाप्रकरणी मगरपट्टा येथील ४३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे दिली फिर्याद

पुणे : लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी गमावण्याची पाळी आली आहे. नोकऱ्याही घटल्या आहेत. त्यामुळे एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळत असेल तर त्यासाठी लोक काहीही करायला तयार होऊ लागले आहेत. त्याचा आता सायबर चोरटे गैरफायदा घेऊ लागले आहेत. एका महिलेला नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तब्बल ११ लाख ९९ हजार ६११ रुपये भरायला भाग पाडले. याप्रकरणी मगरपट्टा येथील ४३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही महिला सध्या एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. तिला आणखी चांगली नोकरी हवी असल्याने तिने नोकरी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती. तिला २१ मे रोजी फोन आला़ रिक्रुटमेंट इन डिड या रिक्रुटमेंट एजन्सीमधून बोलत असल्याचे भासविले. तिला नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले.

श्रृती नायर, रोहित गुप्ता, प्रतिक वर्मा, आनंद, सुधांशु मिश्रा अशा वेगवेगळ्या नावाने त्यानंतर तिला फोन करण्यात आले. नोकरीसाठी रजिस्टेशन, ऑनलाईन मुलाखत, प्रोसेसिंग फी व इतर वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून ७ ते ८ वेळा एकूण ११ लाख ९९ हजार ६११ रुपये रिक्रुटमेंटइनडिड या या वेबसाईटवरील लिंकवर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यापैकी ३ लाख ३९ हजार १४ रुपये परत केले. परंतु कोणतीही नोकरी न देता फिर्यादी महिलेने ट्रान्सफर केलेली ८ लाख ६० हजार ५९७ रुपये परत न करता फसवणुक केली. आपली फसवणुक होत असल्याचे लक्षात आल्यावर तिने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी प्राथमिक तपास करुन हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला असून पोलीस निरीक्षक एच़ टी़ कुंभार अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमWomenमहिलाjobनोकरी