शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्सला सायबर चोरट्यांचा ३ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 11:36 AM

पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या महासिक्युअर अ‍ॅपमध्ये सायबर चोरट्याने लॉगइन करुन पासवर्ड बदलून १२ खात्यातून २ कोटी ९८ लाख ४० हजार रुपये लंपास केले.

ठळक मुद्देसायबर चोरट्यांनी पु. ना. गाडगीळ यांच्या बँक खात्यातून २० बँक खात्यात केली ट्रान्सफर

पुणे : पुण्यातील एका प्रसिद्ध ज्वेलर्स कंपनीच्या महासिक्युअर अ‍ॅपमध्ये सायबर चोरट्याने लॉगइन करुन पासवर्ड बदलून त्यांच्या १२ बँक खात्यातून तब्बल २ कोटी ९८ लाख ४०० रुपयांवर दरोडा टाकून लंपास केले आहेत. ही घटना ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान घडली आहे. याप्रकरणी आदित्य अमित मोडक (वय २८, रा. महात्मा सोसायटी, कोथरुड) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी पु. ना. गाडगीळ यांच्या बँक खात्यातून २० बँक खात्यात ट्रान्सफर केली आहे.  ज्वेलर्स कंपनीचे महासिक्युअर अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व बँक व्यवहार केले जातात. सायबर चोरट्यांनी सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी दुकानाला सुट्टी असताना या महासिक्युअर अ‍ॅपचा पासवर्ड प्राप्त करुन त्यात लॉगइन केले. त्यानंतर त्याचा पासवर्ड बदलला. त्यानंतर या अ‍ॅपच्या सहाय्याने त्यात १९ खाती समाविष्ट केली. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण १२ बँक खात्यातून त्यांनी १९ खाती व आणखी एक खाते अशा २० खात्यांवर तब्बल २ कोटी ९८ लाख ४०० रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर या खात्यातून हे पैसे वेगवेगळ्या ठिकाणाहून काढून घेण्यात आले आहे. हा प्रकार १३ नोव्हेंबरपर्यंत सुरु होता. याबाबत ज्वेलर्स यांच्या वतीने कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी आदित्य मोडक यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशीत १९ बँक खाती निष्पन्न झाली आहे. त्यांनी चौकशी केल्यानंतर आता सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमtheftचोरी