शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

एटीएम मशिनमध्ये स्किमर लावून अनेकांचे पैसे हडपणाऱ्या आरोपींना सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 13:48 IST

पोलिसांनी केला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; १ वर्षांपासून पोलीस आरोपींच्या मागावर..

ठळक मुद्देतीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक; सायबर पोलिसांची कामगिरी

पुणे ( धायरी) : सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी भागातील क्राऊन बेकरी समोर असलेल्या आयसीआयसीआय एटीएम मशिनमध्ये स्किमर लावून अनेक नागरिकांचे लाखो रुपये हडप करणाऱ्या तीन चोरट्यांना सायबर पोलिसांनी अटक केली. विश्वजित डुबेर छत्री (वय: ३३, दांडा खार, मुंबई) प्रकाश शिनप्पा शेट्टी (वय: ४६, दहिसर, मुंबई) फैजी अल्ताफ रझा (वय : ४३, टिळक कॉलनी, अंबरनाथ, ठाणे ) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत आरोपींना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी स्वाती मांढरे (वय :३९, आनंदनगर, सिंहगड रस्ता , पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती मांढरे यांनी २६ सप्टेंबरला सनसिटी भागात असलेल्या आयसीआयसीआय एटीएम मशिनमधून १० हजार रुपये काढले होते. त्यानंतर ३० सप्टेंबरला फिर्यादी घरी असताना दुपारी एकच्या दरम्यान त्यांना ४० हजार रुपये बँक खात्यातून कमी झाल्याचा मोबाईलवर मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या एटीएम मशिनमध्ये व्यवहार करणाऱ्या बऱ्याच नागरिकांना अशाप्रकारे गंडा घातल्याची तक्रारी ह्यापूर्वी आल्या होत्या. सायबर पोलिसांनी तपास करून तीनही आरोपींना बालेवाडी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. ही कारवाई सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण औटे, पोलीस नाईक दीपिका मोहिते,पोलीस शिपाई शिरीष गावडे, अनिल पुंडलिक, सोमनाथ भोरडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके करीत आहेत.          

पोलिसांनी केला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; १ वर्षांपासून पोलीस आरोपींच्या मागावर..  अनेक वेळा नागरिकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब झाल्याच्या घटना सतत घडत आहेत. अशाच घटना सिंहगड रस्ता परिसरातही यापूर्वी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सायबर टीमने सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावर असलेल्या एटीएम मशिनमधील व आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेराच्या तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींना पकडले.  

पैसे काढण्यासाठी  'या' पद्धतीचा वापर .  अशा प्रकारच्या चोरीबाबत सायबर चोरटे जुन्या पद्धतीचे एटीएम मशिन ज्या भागात आहे. अशा भागात रेकी करतात. जेणेकरून ज्या एटीएमला सुरक्षा रक्षक नाहीत. अशा एटीएम मशिनला चोरट्यांकडून स्कीमर लावले जाते. नागरिकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने चोरटे मशीनच्या की-पॅडवर पिनहोल सर्किट कॅमेरा लावत असे. तसेच एटीएम कार्ड ज्या ठिकाणी घातले जाते त्याठिकाणी स्किमर लावत असत. त्यानंतर दोन तासांनी परत येऊन झालेले रेकॉर्डिंग चोरटे घेऊन जात. त्यानंतर लॅपटॉप व कार्ड राईटच्या साहाय्याने त्यानुसार हुबेहूब डुप्लिकेट एटीएम कार्ड बनवून अन्य एटीएम मशीनमधून पैसे काढत असत.    .... 

- ग्राहकांनी जुन्या पद्धतीच्या तसेच संशयास्पद वाटणाऱ्या एटीएम मशिनमधून पैसे काढणे टाळावे, त्याचबरोबर अशापद्धतीने ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी ताबडतोब पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.किरण औटे, पोलीस उपनिरीक्षक , सायबर पोलीस ठाणे

टॅग्स :PuneपुणेatmएटीएमThiefचोरtheftचोरीArrestअटकcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस