धक्कादायक! पत्नीविषयी आक्षेपार्ह बोलला म्हणून कापले मित्राचे गुप्तांग, पुण्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 02:16 PM2018-01-18T14:16:09+5:302018-01-18T14:21:25+5:30

दारू पिताना पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने झालेल्या भांडणात तीक्ष्ण हत्याराने मित्राचे गुप्तांग कापून बेदम मारहाण करण्यात आली. हवली तालुक्यातील पेठ येथील मार्गवस्ती येथे बुधवारी (ता. १७) रात्री १० वाजता ही घटना घडली.

cut the Friend's Penis due to objectionable conversation about wife; incident in Haveli taluka of Pune district | धक्कादायक! पत्नीविषयी आक्षेपार्ह बोलला म्हणून कापले मित्राचे गुप्तांग, पुण्यातील घटना

धक्कादायक! पत्नीविषयी आक्षेपार्ह बोलला म्हणून कापले मित्राचे गुप्तांग, पुण्यातील घटना

Next
ठळक मुद्देसुनील रघुनाथ कटके यास लोणी काळभोर पोलिसांनी घेतले ताब्यातलोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोंडूभैरी यांनी जखमीची विचारपूस करून घटनेची माहिती घेतली

कोरेगाव मूळ : दारू पिताना पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने झालेल्या भांडणात तीक्ष्ण हत्याराने मित्राचे गुप्तांग कापून बेदम मारहाण करण्यात आली. हवली तालुक्यातील पेठ येथील मार्गवस्ती येथे बुधवारी (ता. १७) रात्री १० वाजता ही घटना घडली.
देवांग चंद्रकांत देसाई (वय ५१, सध्या  मार्गवस्ती, नायगाव, ता. हवेली मूळ रा. नवसारी, ता. जमापूर, गुजरात) असे जखमीचे नाव असून त्यास मारहाण केल्याप्रकरणी सुनील रघुनाथ कटके (रा. मार्गवस्ती, नायगाव, ता. हवेली) यास लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी देवांग देसाई व सुनील कटके हे मित्र असून देवांग देसाई हा नायगाव हद्दीतील मार्गवस्ती परिसरातील फ्रेश पोल्ट्रीवर व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. देसाई यांच्या पत्नी गावी गेल्या होत्या. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोघेही पोल्ट्री फर्मावरील एका खोलीत दारू पीत बसले होते. दोघांमध्ये चेष्टा मस्करी चालू असताना सुनील कटके याने देसाईला एकटपणावरून चिडवले, त्यास प्रत्युत्तर म्हणून देसाई याने सुनील कटकेच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे चिडलेल्या सुनीलने देसाईवर जवळच पडलेल्या तीक्ष्ण हत्याराने वार करण्यास सुरुवात केली. यात त्याने देसाई याच्या गुप्तांगावर वार केले. मारहाणीनंतर सुनीलने देसाई याला खोलीत बंद करून तेथून निघून गेला. जखमी अवस्थेतील देसाई याने आपल्या जवळील फोनवरून मित्राला बोलावून स्वत: लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला. 
दरम्यान लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोंडूभैरी यांनी जखमीची विचारपूस करून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी तातडीने सुनील कटके यास ताब्यात घेतले असता वरील घटनेचा उलगडा झाला. 

Web Title: cut the Friend's Penis due to objectionable conversation about wife; incident in Haveli taluka of Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.