पुणे विमानतळावर पकडले 35 लाखांचे परदेशी चलन ; कस्टम विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 19:33 IST2019-07-18T17:11:44+5:302019-07-18T19:33:48+5:30
पुणे विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी 35 लाख रुपयांचे परदेशी चलन दाेन प्रवाशांकडून ताब्यात घेतले आहे.

पुणे विमानतळावर पकडले 35 लाखांचे परदेशी चलन ; कस्टम विभागाची कारवाई
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाेन प्रवाशांकडून 35. 41 लाख रुपयांचे परदेशी चलन पकडले आहे. मंगळवारी पुण्याहून स्पाईस जेटच्या विमानाने दुबईला जाणाऱ्या बालाजी मस्तापुरे आणि मयूर भास्कर पाटील यांच्या तपासणीत हे चलन आढळून आले. याप्रकरणी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दाेघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास करण्यात येत आहे.
बालाजी आणि मयूर हे स्पाईस जेटच्या विमानाने दुबईला निघाले हाेते. जेव्हा त्यांची तपासणी करण्यात आली, त्यावेळी त्यांच्याकडे रियाल्स हे साैदी अरेबियाचे चलन आढळले. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा त्यांच्या सामानाची तपासणी केली, त्यावेळी त्यांच्याकडे 35.41 लाख रुपयांचे रियाल्स आढळून आले. चाैकशी दरम्यान हे चलन त्यांचे नसून दुबईला काेणाला तरी देण्यास सांगण्यात आल्याचे दाेघांनी कस्टम अधिकाऱ्यांना सांगितले. यावरुन अधिकाऱ्यांनी चलन ताब्यात घेऊन कस्टम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. दाेन्ही प्रवाशांनी परदेशी चलन साेबत घेऊन जात असल्याचे चाैकशी दरम्यान मान्य केले.
ही संपूर्ण कारवाई पुण्याच्या कस्टम विभागाच्या उपायुक्त उषा भाेयर यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टम अधिक्षक विनिता पुसदेकर आणि संजय झरेकर यांनी केली.