शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Medha Kulkarni: कोथरूड भाजपमधील नाराजी नाट्यावर पडदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 12:11 IST

प्रदेशाध्यक्षांच्या आदेशावरून शहराध्यक्ष धीरज घाटे लवकरच सर्व संबंधितांशी संवाद साधणार आहेत...

पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर कोथरूड भाजपात जाहीरपणे नाराजी नाट्य व्यक्त झाले, मात्र आता काहीही वाद राहणार नाहीत. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशावरून शहराध्यक्ष धीरज घाटे लवकरच सर्व संबंधितांशी संवाद साधणार आहेत.

कोथरूडच्या सिटिंग आमदार असूनही उमेदवारीत डावलले गेले. त्यानंतरही मागील ४ वर्षे माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी शांत होत्या. ऐन उड्डाणपुलाच्या कार्यक्रमाआधी एक दिवस त्यांनी समाजमाध्यमातून जाहीरपणे कोथरूडमधील पदाधिकाऱ्यांवर नाव न घेता तोफ डागली. पुलाच्या कामाचा आपण पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेली नाही, असे म्हणत त्यांनी आपले अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्या कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांंनी डॉ. कुलकर्णी यांना कार्यक्रमात व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थान दिले.

शिवाय कार्यक्रमानंतर गडकरी यांनी डॉ. कुलकर्णी यांच्या निवासस्थानीही गेले. त्यामुळे नाराज झालेल्या कोथरूडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी कोथरूड विधानसभेचे भाजप अध्यक्ष पुनीत जोशी यांच्या माध्यमातून डॉ. कुलकर्णी यांनी पक्षशिस्त सोडून वागल्याची टीका केली. उद्घाटनाच्या होर्डिंग्जवर त्यांचे छायाचित्र असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचबरोबर अशा पद्धतीने जाहीरपणे पक्षातील गोष्ट चव्हाट्यावर आणणे अयोग्य आहे, यामुळे लहान-लहान गोष्टींवरून कार्यकर्ते असेच वागतील, अशी भीतीही व्यक्त केली. त्यावरून नाराजीनाट्य वाढतच जाईल याचा अंदाज आल्याने पक्षनेतृत्वानेच याची दखल घेतली आहे.

पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्र्यांसमोर असे होणे योग्य नाही. डॉ. कुलकर्णी जाहीरपणे बोलल्या असतील, पण त्याधी त्यांना डावलणे, पक्षाचे निरोप न देणे, पक्षाच्या मोठ्या कार्यक्रमांचे जाहीर पास न देणे हेही अयोग्यच असल्याचे, मत पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केले असल्याचे समजते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मर्जी सांभाळण्यासाठी कोणी परस्पर असे करत असेल तर त्यांना समज द्यायला हवी, असेही मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती मिळाली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात लक्ष घालण्याचा आदेश दिला आहे. मी लवकरच यातील सर्व संबंधितांशी बोलणार आहे. त्यानंतर कोथरूड भाजपात कसलीही नाराजी किंवा मतभेद राहणार नाहीत.

- धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप

टॅग्स :BJPभाजपाPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड