शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सिंहगड रोडवरील वडगाव, धायरी, नर्‍हे भागात कर्फ्यु ; लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 13:37 IST

सिंहगड रोडवरील नर्‍हे, हिंगणे, धायरी व आजू बाजूंच्या परिसरातील रस्ते बंद

ठळक मुद्देलोकांना घरात थांबण्याच्या सूचना

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव शहरातील विविध भागात वाढत असून त्यामुळे बुधवार सकाळपासून सिंहगड रोडवरील वडगाव धायरी व परिसरात कर्फ्यु लावण्यात आला आहे. सिंहगड रोडवरील नर्‍हे, हिंगणे, धायरी व आजू बाजूंच्या परिसरातील रस्ते बंद करण्यात येत आहेत. पोलीस लोकांना घरातून बाहेर पडू नका, असे स्पिकरवरुन आवाहन करीत आहे. पुण्यात आज ९ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. सिंहगड रोड परिसरातील अनेक भागात लोकांना होम क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी काही जण आता कोराना बाधित असल्याचे आढळून आले. तसेच या परिसरात लोक लॉक डाऊन केला असतानाही लोक तो पाळताना दिसत नाही. त्यामुळे या परिसरातही कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहगड रोडवर येणारे रस्ते, गल्ल्या, बॅरिकेट लावून बंद करण्यात येत आहेत. याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी सांगितले की, या भागात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्यांपैकी काही जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सकाळपासून या भागात कर्फ्युची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. एक एक भाग बंद करण्यात येत आहे. लोकांना घरात थांबण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. याबरोबरच मंगळवार पेठेच्या आणखी काही भागात कोरोना बाधित रुग्ण सापडले. या अगोदरच मंगळवार पेठेच्या काही भागात कर्फ्यु लागू करण्यात आला होता. आता त्यात वाढ करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस