शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोरमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार अखेर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 19:08 IST

पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई, कदमवस्ती परिसरात निर्माण केली होती दहशत

ठळक मुद्देचौदा मेला गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता

लोणी काळभोर: पाच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलीसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. याप्ररकणी ऋषीकेश सुरेश पवार ( वय २३, रा. कदमवस्ती, लोणी काळभोर, ) याला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात या प्रकरणी महेश मारुती शिरसट ( वय. २९, कदमवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली ) यांनी फिर्याद दिली आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ मेला रात्री ८ वाजता फिर्यादीचे वडील मारुती पवार हे त्यांच्या दुचाकीवरुन घरी येत होते. त्यावेळी ऋषिकेश पवार हा मित्रांसोबत त्यांच्या दुचाकी रस्त्याच्या मधोमध उभ्या करुन गप्पा मारत होते. पवार यांना गाडी चालवण्यास अडथळा निर्माण झाल्याने त्यांनी ऋषिकेशला गाडी बाजुला घेण्यास सांगितले होते. तेव्हा त्याने तू मला गाडी बाजुला घ्यायला सांगतो काय? दाखवतोच तुला मी काय आहे अशी धमकी दिली होती. त्यावेळी किरकोळ वाद झाला परंतु त्याची गावात दहशत असल्यामुळे त्याच्या विरुध्द पोलिसात तक्रार केली नव्हती.

त्यानंतर १४ मे रोजी रात्री ९ - ३० वाजण्याच्या सुमारांस महेश शिरसट हे वडील, बहिण, पत्नीसमवेत घराबाहेर ओट्यावर बसले होते. तेव्हा ऋषिकेश हा त्याचा मित्र अक्षय ओव्हाळ याच्यासोबत आला. महेशला घराबाहेर बसलेले पाहुन दोघांनी हातातील कोयता व लोखंडी पाईपने हात, पाय व पाठीवर लोखंडी पाईपने तसेच कोयत्याने उलट्या बाजुने त्याला मारहाण केली. त्यावेळी भाऊ सोडवण्यासाठी आला असता त्यालाही ओव्हाळने लाथ मारुन लोखंडी पाईपने मारहाण केली. व पवार यांच्या अंगावर कोयता घेऊन धावून गेला. त्यावेळी महेश घाबरुन वाचण्यासाठी ओरडू लागले. परंतू दहशतीमुळे कोणीही वाचवण्यासाठी आले नाही.

नंतर ते त्या दोघांचे तावडीतुन सुटत घराजवळ राहणाऱ्या उमा कचरे यांच्या घरात जाऊन लपले. त्यावेळी ते पाठलाग करत त्या ठिकाणी आले. घराचा दरवाजा बंद असल्यामुळे त्यांनी कचरे यांवे दरवाजावर लोखंडी पाईप व कोयता मारला. तसेच दगड उचलुन कचरे यांचे दरवाजावर फेकले.  शिवीगाळ करुन तु बाहेर ये तुला दाखवतो मी ईथला भाई आहे. माझ्या नादी लागायच नाही अशी धमकी देऊन निघुन गेले. त्याचे दहशतीने आजुबाजुचे परिसरातील सर्व लोकांनी घाबरुन जाऊन आपआपले दरवाजे बंद केले.  

१४ मेला  गुन्हा दाखल झाल्यापासून ऋषीकेश फरार होता. १ जून रोजी तो कदमवस्ती येथे येणार असल्याची माहिती गोपनीय खब-यांमार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याचा साथीदार आकाश ओव्हाळ हा अद्याप फरारी आहे. ऋषीकेश पवार याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, दरोड्याची पूर्व तयारी करणे, आर्म ॲक्ट अशा प्रकारचे पाच गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक