शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कलचाचणी : आभास की वास्तव?

By admin | Updated: April 19, 2017 04:07 IST

कलचाचणीच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर विद्यार्थ्याचे करिअर धुळीस मिळू शकते. त्यामुळे कलचाचणीच्या नावावर दुकाने थाटून बसणाऱ्यांपासून सावध राहा

पुणे : कलचाचणीच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर विद्यार्थ्याचे करिअर धुळीस मिळू शकते. त्यामुळे कलचाचणीच्या नावावर दुकाने थाटून बसणाऱ्यांपासून सावध राहा. तसेच, त्यांच्याकडून दाखविल्या जाणाऱ्या दिशादर्शनावर पूर्णत: विसंबून न राहता शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यंकाची, आवडीनिवडीची तपासणी केल्यानंतर मार्गदर्शनानुसार करिअरची निवड करा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.दहावी-बारावीनंतर कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असते. काही पालक आपल्या कुटुंबातील उच्च शिक्षितांचा सल्ला घेतात, तर काही विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींनी निवडलेल्या अभ्यासक्रमाचीच निवड करतात. परंतु, काही वर्षांपासून पालकांमध्ये जागृती झाली आहे. करिअर मार्गदर्शकांकडून सल्ला घेऊन विद्यार्थ्यांचा कल तपासून अभ्यासक्रम निवडीबाबत निर्णय घेतला जात आहे. राज्य शासनातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच, काही खासगी संस्थांकडून अवाच्या सवा शुल्क आकारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. परंतु, बुद्ध्यंक, आवडीनिवडी, गणित, भाषा विषयातील ज्ञान आदींच्या आधारे शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या जाणाऱ्या कलचाचणीनुसार विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम व करिअर निवडणे उचित ठरणार आहे.राज्य शासनाच्या विद्या प्राधिकरणांतर्गत पुण्यात विभागीय व्यवस्थापन मार्गदर्शन व निवड संस्थेच्या माध्यमातून मानसशास्त्रीय कसोटीद्वारे मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते. प्रत्येक सोमवारी सुमारे ५० ते ६५ विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्या घेऊन त्यांचा बुद्ध्यंक तपासला जातो. तसेच, शासनाच्या कोणत्या संस्थेमधील कोणता अभ्यासक्रम निवडता येईल, याबाबत तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो. एखाद्या विद्यार्थ्याला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची आवड असते; परंतु त्याची क्षमता नसते. त्यामुळे त्याला डॉक्टर होता आले नाही, तर वैद्यकीय क्षेत्रात तो कोणते करिअर करू शकेल, या संदर्भातील योग्य माहिती विद्यार्थ्यांना मिळू शकते. त्यामुळे कलचाचणी करून घेणे योग्य आहे.(प्रतिनिधी)