शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

हिंदू धर्म आणि वेदांवर टीका करणे सध्याचे पुरोगामित्वाचे लक्षण : वा.ना उत्पात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 6:30 PM

भगवदगीता तोंडपाठ आहे असे म्हणणाऱ्या पुढाऱ्याला एक श्लोकही व्यवस्थितपणे म्हणता आला नाही हे आपण सर्वांनीच पाहिले आहे,

ठळक मुद्देश्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार प्रदान

पुणे : हिंदू धर्म आणि वेदांवर टीका करणे हे सध्याच्या काळात पुरोगामित्वाचे लक्षण झाले आहे, असे भाष्य करीत, भगवदगीता तोंडपाठ आहे असे म्हणणाऱ्या पुढाऱ्याला एक श्लोकही व्यवस्थितपणे म्हणता आला नाही हे आपण सर्वांनीच पाहिले आहे, अशी टिप्पणी भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी त्यांनी केली. श्री देवदेवेश्वर संस्थानतर्फे गणेश जयंती उत्सवानिमित्त ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसन महाराज साखरे यांच्या हस्ते पूर्णवादाचे अभ्यासक विष्णू महाराज पारनेरकर आणि भागवताचार्य वा. ना.उत्पात यांना श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी उत्पात बोलत होते. संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, डॉ. उदयसिंह पेशवे, सुधीर पंडित या वेळी उपस्थित होते. उत्पात म्हणाले, पेशव्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे. हा पुरस्कार मी माझे गुरु अनंतराव आठवले ऊर्फ वरदानंद भारती यांच्या स्मृतीस अर्पण करतो. सावरकर विचारांचा पाईक असूनही हिंदू  धर्माचा मी अभिमानी आहे. पारनेरकर म्हणाले, देवाची पूजा आणि भक्ती करण्याची विद्या समजून घेतली पाहिजे. अन्यथा ती अंधश्रद्धा ठरेल. ज्ञान हे व्यक्तीपरत्वे वेगळे असते. मात्र, विद्या गुरुने शिकविल्यानंतरच प्राप्त होते. साखरे म्हणाले, मानवी जीवनात दानाला विशेष महत्त्व आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी दैवी संपत्तीने मोठा होणे महत्त्वाचे आहे. माणसाने निर्मत्सर व्हावे हेच ज्ञानेश्वरीने सांगितले आहे.भागवत यांनी प्रास्ताविक केले. पंडित यांनी आभार मानले. अदिती अत्रे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेHinduहिंदूAdhyatmikआध्यात्मिक