Criminals was arrested who robbery on home : 4 lakh 17 thousand items seized | भरदिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद : ४ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त 

भरदिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद : ४ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त 

धनकवडी : भरदिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले असून त्याच्या ताब्यातून चार लाख सतरा हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला. शशिकांत अनंत माने (वय २४ , रा. हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण परिसरात घरफोडी, वाहनचोरी, जबरी चोरी, दरोडा असे एकुण २८ गुन्हे दाखल आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सहकारनगर पोलीस ठाण्यात एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता. यामध्ये फिर्यादी महिला दुपारी घरास कुलूप लावून बाहेर गेल्या असता, चोरट्याने घरातील १०७  ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख दिड लाखाचा ऐवज चोरला होता. या गुन्हयाचा तपास करत असताना पोलीस नाईक संदीप ननवरे व भुजंग इंगळे यांना खबर मिळाली की माने हा मांजरी फार्म येथे नातेवाईकांना भेटण्यास येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले, त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने एक घरफोडी व तीन वाहन चोरी असे चार गुन्हे केल्याची कबुली दिली. 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापु खुटवड, विजय मोरे, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, भुजंग इंगळे, सदिप ननवरे, सतिश चव्हाण, महेश मंडलिक, देवा चव्हाण, प्रदिप बेडिस्कर, शिवलाल शिंदे, प्रदिप शिंदे यांच्या पथकाने केली.सराईत गुन्हेगारा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Criminals was arrested who robbery on home : 4 lakh 17 thousand items seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.