शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
6
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
7
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
8
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
9
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
10
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
11
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
12
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
13
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
14
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
15
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
16
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
17
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
18
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
19
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
20
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगाधिकाऱ्यांनी बुडविली कैद्याची परीक्षा

By admin | Updated: March 26, 2015 01:33 IST

कारागृहातील एका कैद्याला बी.कॉम.च्या परीक्षेला बसू न दिल्याबद्दल तपास अधिकारी, तुरुंग अधीक्षक व सरकारी वकिलांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस न्यायालयाने बजावली आहे.

पुणे : परवानगी दिलेली असतानाहीयेरवडा कारागृहातील एका कैद्याला बी.कॉम.च्या परीक्षेला बसू न दिल्याबद्दल तपास अधिकारी, तुरुंग अधीक्षक व सरकारी वकिलांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस न्यायालयाने बजावली आहे. न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी हा आदेश दिला आहे. फेसबुकवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी शहरात उसळलेल्या दंगलीत हडपसर येथील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याचा खून झाला होता. या गुन्ह्यात हिंदूराष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह २२ संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे संशयित सध्या येरवडा कारागृहात आहेत. आपल्याल बी. कॉम.च्या परीक्षेला बसू द्यावे, असा अर्ज यातील एका संशयिताने न्यायालयात केला होता. १३ मार्च २०१५ रोजी न्या. जे. टी. उत्पात यांनी मंजूर करून त्यासंबंधी हडपसर पोलिसांना व तुरुंग अधीक्षकांना तसे आदेश दिले होते.या संशयिताचा पहिला पेपर मंगळवारी होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला हडपसर येथील महाविद्यालयात परीक्षेसाठी नेले नाही. त्यामुळे कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल तपासी अंमलदार व सरकार पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावावी, असा अर्ज अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी बुधवारी केला. न्यायालयाने त्याची दखल घेऊन तपासी अधिकारी, तुरुंग अधीक्षक व सरकारी वकिलांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती अ‍ॅड. पवार यांनी दिली.