शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर गुन्हेगारांची बर्थडे पार्टी; पोलिसांचा धाक राहिला नाही, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:06 IST

गुन्हेगारांवर बचत ठेवण्यासाठी पोलीस का कमी पडताहेत? की गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव येतो? अनेक सवाल उपस्थित

पुणे: पुण्यातील विमाननगर परिसरात एका पबच्या पार्किंगमध्ये कथित गुन्हेगारांची बर्थडे पार्टी मोठ्या थाटात झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना कथित गुन्हेगारांनी अशाप्रकारे बर्थडे पार्टी करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण करणारं आहे. शनिवारी मध्यरात्री विमाननगरमधील एका पबच्या पार्किंग मध्ये काही कथित भाई लोकांनी एकत्र येत बर्थडे पार्टी साजरी करत गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.  

एका पार्किंगचा मोठा परिसर दिसत आहे. त्यात या कथित गुन्हेगारांची टोळी, आणि त्यांना पाठिंबा देणारे पाच पन्नास टाळकी दिसताहेत, ही पार्टी फिरोज शेख याने आयोजित केली होती. जो विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या पार्टीमध्ये शंभरहून अधिक युवक सहभागी झाले होते.आणि ज्या चौकातील पबमध्ये ही पार्टी झाली. त्याच परिसरात त्याने याआधी पोलिसांशी हुज्जत घालून अरेरावी केली होती. या पार्टीत मोक्कातील आरोपी असलेला गुन्हेगार आकाश कंचिलेदेखील त्याच्या टोळीसमवेत उपस्थित होता. ही पार्टी त्याच टोळीचा म्होरक्या निखिल कांबळे याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती. निखिल कांबळेवर येरवडा पोलिस ठाण्यात पोलिसांच्या कस्टडीतून पळून जाण्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातून काही दिवसांपूर्वीच तो येरवडा जेलमधून सुटून आला आहे.

या डीजे पार्टीमुळे विमाननगर परिसरात प्रचंड चर्चा सुरू असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना कथित गुन्हेगारांनी ही पार्टी केली आहे. याचा अर्थ पोलिसांचा कुठल्याच प्रकारचा धाक गुंडांना राहिलेला नाही हे स्पष्ट होत आहे. पोलिसांचा धाक न राहण्याला पोलीसच जबाबदार आहेत का? याचा विचार आता पॉलिसी खात्यानेच करायला हवा, गुन्हेगारांवर बचत ठेवण्यासाठी पोलीस का कमी पडताहेत? की गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव येतो? या सगळ्या गोष्टींचा तपास होणं आता गरजेचं आहे, त्यामुळे पोलिस या प्रकरणात कारवाई करतील का? गुन्हा दाखल केला जाईल का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलMONEYपैसा