criminals arrested at pune, two pistols and 4 cartridges seized | पुण्यात सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्तुल, ४ काडतुसे जप्त

पुण्यात सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्तुल, ४ काडतुसे जप्त

ठळक मुद्देआरोपीवर खुन, खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी, घरफोडी असे २५ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल

पुणे: दोन खुनासह, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी असे एकूण २५  गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला खडक व फरासखाना पोलिसांनी दत्तवाडी येथे अटक केली. त्यात दोन देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व चार काडतुसे असा एकूण एक लाखांचा शस्त्र जप्त केली. सुनिल उर्फ चॉकलेट सुन्या किशोर डोकेफोडे (वय३३,रा.लेन नं. ८, जयभवानीनगर, पर्वती पायथा, पुणे)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस नाईक सचिन जाधव यांना त्यांच्या बातमीद्वारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार, एक इसम पर्वती पायथा इथे रस्त्यावर दोन देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल घेवून उभा असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करुन या गुन्हेगाराला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत चार काडतुसेही जप्त केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून अनेक गंभीर गुन्ह्यात या आरोपीचा दत्तवाडी पोलीस शोध सुरु होता. परंतु, तो शिताफीने जागा बदलून पर्वती पायथा परिसरात राहत होता. त्याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी, घरफोडी असे २५ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, सचिन जाधव, इम्रान शेख, रिजवान जिनेडी, सुभाषश पिंगळे, तुषार माळवदकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: criminals arrested at pune, two pistols and 4 cartridges seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.