शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

किरकोळ वादातून तडीपार गुंडाने आईच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 7:12 PM

तुझ्यामुळे माझी पत्नी माझ्याबरोबर नांदत नाही, असे म्हणून सिमेंटचा ब्लॉक घातला आईच्या डोक्यात..

ठळक मुद्देआरोपीला अटक, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : दारू पिल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून तडीपार गुंडाने स्वत:च्या आईच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार दांडेकर पूल येथे सोमवारी दुपारी तीन वाजता घडला.दत्तवाडी पोलिसांनी नीलेश सुरेश जोगदंड (वय २८, रा. दांडेकर पूल, पेट्रोल पंपाशेजारी) याला अटक केली आहे. याप्रकरणी बायडाबाई सुरेश जोगदंड (वय ४६,रा. दांडेकर पूल) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश जोगदंड हा दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे, असे असतानाही तो तडीपारीचे उल्लंंघन करून पुण्यात आला होता. तो सोमवारी दुपारी दारू पिऊन घरी आला होता. त्याचा आईबरोबर वाद झाला. तेव्हा तो आईला तुझ्यामुळे माझी पत्नी माझ्याबरोबर नांदत नाही, असे म्हणून रागाच्या भरात घराबाहेर रस्त्यावर पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून आईच्या डोक्यात घातला. यामध्ये बायडाबाई या गंभीर जखमी झाल्या़ बायडाबाई यांना वाचविण्यासाठी आलेले राकेश संजय टकलेयांनाही त्याने गाडीच्या चावीने उजव्या गालावर मारहाण करून जखमी केले.या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी नीलेश जोगदंडला अटक केली असून त्याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिसArrestअटक