शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विमानाची तिकीटे घेऊन दीड कोटींची फसवणूक करणाऱ्या इग्लंडमधील कंपनीविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 16:12 IST

पुण्यातील एजन्सीकडून विमानाची तिकीटे घेऊन त्याचे पैसे न देता १ कोटी ४३ लाख ५३ हजार फसवणूक केल्याप्रकरणी इग्लंडच्या ए शुलमन आय एन सी लिमिटेड या कंपनीच्या प्रमुखासह भारतातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यातील एजन्सीकडून विमानाची तिकीटे घेऊन त्याचे पैसे न देता १ कोटी ४३ लाख ५३ हजार फसवणूक केल्याप्रकरणी इग्लंडच्या ए शुलमन आय एन सी लिमिटेड या कंपनीच्या प्रमुखासह भारतातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    याप्रकरणी निखिल ठाकुरदास (वय ४२, रा़ कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरेगाव पार्क येथील गेरा गार्डनमध्ये ओडिसी टुर्स अँड ट्रव्हल्स या कंपनीचे कार्यालय असून कंपनीकडून विमान तिकीट विक्रीचा व्यवसाय केला जातो़. निखिल ठाकुरदास हे या कंपनीत मुख्य व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांची एजन्सी भारतातील व परदेशातील वैयक्तिक प्रवास व कॉर्पोरेट कंपन्या यांच्यासाठी विमान तिकीटे, हॉटेल व टुरिझम ही सेवा पुरविते.  ए शुलमन प्लास्टिक इंडिया या बडोदा येथील कंपनी ओडिसा टुर्सचे ८ वर्षांपासून ग्राहक आहेत. त्यांची मुख्य कंपनी यु के शुलमन आय एन सी लि़ या नावाने इंग्लडमध्ये आहे. या कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक जॉन स्टील हे असून भारतातील कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी रणदीप रणदेव, व्यवस्थापक निराली मोरे, महाव्यवस्थापक सुबेंद्रु रॉय हे आहेत.  या कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक जॉन स्टील व इतर लोकांनी २७ ऑगस्ट  ते २ सप्टेंबर २०१५ या दरम्यान ओडिसी टुर्सकडून ९८ आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाची तिकीटांची खरेदी करुन त्या तिकीटांचे पैसे न देता या तिकीटांचा वापर केला़ ठाकुरदास यांनी कंपनीकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. 

    २०१५ मध्ये कोरेगाव पार्कपोलिसांकडे फसवणूक झाल्याचा अर्जही दिला होता़ दरम्यान, पैसे देण्याबाबत त्यांच्यात सातत्याने ई मेल व प्रत्यक्ष बोलणी सुरु होती. त्यामुळे जर गुन्हा दाखल केला तर पैसे मिळायला अडचण होईल, म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला नव्हता. आता ती कंपनी ठाकुरदास यांना फक्त ५ हजार डॉलर घ्या व हे प्रकरण मिटवा असे म्हणू लागली़. त्यामुळे ओडिसी टुर्सला मोठे नुकसान होणार असल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करुन फसवणूक करण्याच्या इराद्याने ही तिकीट खरेदी करुन फसवणूक केल्याबद्दल फिर्याद दिली असून कोरेगाव पार्क पोलिसांनी जॉन स्टील व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीairplaneविमानPoliceपोलिसKoregaon Parkकोरेगाव पार्क