ऊसाच्या शेतात पळालेला सराईत गुन्हेगार जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 06:51 PM2020-01-14T18:51:28+5:302020-01-14T18:53:26+5:30

आरोपीचे वय २३ वर्षे,गुन्हे मात्र २४... 

criminal arrested who disappear in the Sugarcane field | ऊसाच्या शेतात पळालेला सराईत गुन्हेगार जेरबंद

ऊसाच्या शेतात पळालेला सराईत गुन्हेगार जेरबंद

Next
ठळक मुद्देअंगातील कपडे काढुन ऊसाच्या खोडापाशी सापडला उघडा बसलेला आरोपी

आव्हाळवाडी : मांजरी खुर्द वाघोली रस्त्यांने लोणीकंद गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना, मागे पुढे नंबर नसलेल्या दुचाकी वरून मांजरी खुर्द हद्दीत एक जण आढळून आला. त्याच्याकडे गाडी,नंबर प्लेटबाबत चौकशी केली असता ती व्यक्ती दुचाकी सोडून,शेजारच्या ऊसाच्या शेतात पळून गेली .
      पोलिसांची आणखी कुमक मागवून मांजरी खुर्द पोलीस पाटील, पोलीस मित्र, शांतीदुत ग्रामस्थांच्या मदतीने सायंकाळी अर्धा एकर ऊस अक्षरश: दोनदा पिंजुन काढला. शेवटी तिसऱ्यांदा हवालदार बाळासाहेब सकाटे यांना ऊसाच्या खोडापाशी अंगातील कपडे काडून उघडा बसलेला आरोपी बंड्या उर्फ बंडू मधुकर पवार (वय २३, रा.ढोकबाबळगाव ,ता.मोहोळ, जि.सोलापूर) हा सापडला.
.................
आरोपीचे वय २३ वर्षे,गुन्हे मात्र २४ 
आरोपीस लोणीकंद पोलीस स्टेशनला नेऊन अधिक चौकशी करता आरोपी बंड्या ऊर्फ बंडू मधुकर पवार याचेवर घरफोडी व चोरीचे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन दोन गुन्हे दाखल, फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर एक गुन्हा दाखल, जीआरपी सोलापूर रेल्वे पोलीस एक गुन्हा दाखल, सोलापूर एमआयडीसी पोलीस स्टेशन एक, तर पुणे जिल्ह्यातील लोणीकंद, लोणी काळभोर, यवत,रांजणगाव, वडगाव निंबाळकर, दौंड,हडपसर अशा विविध ठिकाणी नऊ घरफोडी उघडकीस आल्या आहेत.
    तपासादरम्याने आरोपीकडून दुचाकी, चारचाकी आणि चोरी करण्यात आलेला ऐवज ताब्यात घेण्यात आला. आरोपी कडून फक्त चार दिवसात नऊ घरफोड्या, नऊ मोटारसायकल, एक मोटार कार, ५८ ग्रँम सोने, १०५ ग्रँम चांदी, ०२ एलईडी, ०४ मोटार कारचे टायर व डिस्क असा साडेसात लाखांचा माल हस्तगत करण्यात आला. आरोपीस १६ जानेवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
    
   ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील, हवेली उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उप पोलीस निरीक्षक हणमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस नाईक मोहन अवघडे, पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, पोलीस काँस्टेबल समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे, दत्ता काळे, प्रफुल्ल सुतार, सुरज वळेकर,या पथकाने कार्यवाही केली.

Web Title: criminal arrested who disappear in the Sugarcane field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.