पुणे : तडीपार केले असतानाही रात्री शहरात येऊन घरफोडी करणाऱ्यास चतु:श्रृंगी पोलिसांनीअटक केली असून त्याच्याकडून ११ गुन्हे उघडकीस आले आहेत़. जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३२, रा़ कातवी, ता़ मावळ, मुळ डी़ पी़ रोड, आंबेडकर वसाहत, औंध) असे त्याचे नाव आहे़. त्याच्याकडून ४२२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम चांदीचे दागिने, ६४ हजार रुपये रोख, स्क्रु ड्रायव्हर, पान असा एकूण १३ लाख ४२ हजार ३५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़.याबाबत अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आतापर्यंत ८७ घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेत़. त्यामुळे त्याला नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे शहरातून तडीपार करण्यात आले होते़. त्यानंतरही तो रात्रीच्या वेळी शहरात येऊन घरफोड्या करीत असे़. ६ नोव्हेंबर रोजी चतु:श्रृंगी तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना पाषाण येथील निम्हण मळा येथे पथकाला तो दिसला़. त्याला थांबण्याचा इशारा केल्यावरही तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन आरोपीला पकडले़. त्याच्यावर तडीपारीभंगाचा गुन्हा दाखल करुन तपास केला असता त्याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १९ घरफोडीचे गुन्हे व एक सेनापती बापट रोडवरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे़. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, वैशाली गलांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, उपनिरीक्षक प्रेम वाघमारे, कर्मचारी बबन गुंड, बाळासाहेब गायकवाड, मारुती पारधी, सारस साळवी, अजय गायकवाड, संतोष जाधव, महेश बामगुडे, संजय वाघ, दादा काळे, ज्ञानेश्वर मुळे, अमर शेख, तेजस चोपडे, अमित गद्रे यांच्या पथकाने केली आहे़. .........................एकट्याने केल्या ८७ घरफोड्याजयवंत गायकवाड याच्यावर यापूर्वी ८७ घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत़. त्याला २०१४ मध्ये घरफोडीच्या खटल्यात एक वर्षाची शिक्षा झाली होती़. ती भोगून तो तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा घरफोड्या करु लागला होता़. तो नेहमी एकटाचा गुन्हे करायचा़ औंध येथे राहत असल्याने याच परिसरात तो प्रामुख्याने गुन्हे करायचा़. सुरक्षारक्षक नसलेल्या सोसायटीत रात्रीच्या वेळी जाऊन बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून तो घरफोड्या करीत असे़. या ११ गुन्ह्यातील १८ तोळे सोने त्याच्या घरातून तर २२ तोळे सोने सोनाराकडून जप्त केले आहे़. त्याला सोन्याची विल्हेवाट लावण्यास मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी यांनी सांगितले़.
तडीपार असताना घरफोडी करणारा जेरबंद , ११ गुन्हे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 15:43 IST
जयवंत गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आतापर्यंत ८७ घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेत़. त्यामुळे त्याला नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे शहरातून तडीपार करण्यात आले होते़.
तडीपार असताना घरफोडी करणारा जेरबंद , ११ गुन्हे उघड
ठळक मुद्देचतु:श्रृंगी पोलीस : १३ लाखांचा ऐवज जप्तजयवंत गायकवाड याच्यावर यापूर्वी ८७ घरफोड्यांचे गुन्हे दाखल २०१४ मध्ये घरफोडीच्या खटल्यात एक वर्षाची शिक्षा