शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पूर्वग्रहदुषित खोटे गुन्हे मागे घ्यावेत ; अन्यथा आंदोलन : विश्व हिंदू परिषदेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 7:33 PM

पोलिसांनी कायद्याचा गैरवापर करत जाणीवपुर्वक व सूडबुद्धीने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देविश्व हिंदू परिषदेच्यावतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मुलींकडे एअर रायफल व तलवारी प्रकरण

पिंपरी : निगडी येथील विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेतील शस्त्रे खोटी होती. तरीही पोलिसांनी कायद्याचा गैरवापर करत जाणीवपुर्वक व सूडबुद्धीने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. यातून विश्व हिंदू परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी कायद्याचा गैरवापर करणाऱ्या पोलीस पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करुन आमच्यावर दाखल केलेले पूर्वग्रहदुषित खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.     यावेळी दुर्गावाहिनी प्रांतप्रमुख मृणालिनी पडवळ, जिल्हा अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा मंत्री नितीन वाटकर उपस्थित होते. रविवारी निगडी येथे विश्व हिंदू परिषदेच्यावतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुलींकडे एअर रायफल व तलवारी होत्या. तसेच ही शोभायात्रा विनापरवाना काढल्याबाबत निगडी पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विवेक कुलकर्णी बोलत होते. ते म्हणाले, विश्व हिंदू परिषदेचा दुर्गावाहिनी हा विभाग युवतींच्या शारीरिक, मानसिक व बौद्धीक अशा सर्वांगीण विकासासाठी देशभरातने महिन्यात शौर्य प्रशिक्षण वर्ग आयोजित करतो. याचाच एक भाग म्हणून २७ मे ते ३ जून या कालावधीत निगडी येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. त्यानिमित्त रुपीनगर मैदान ते ठाकरे मैदान या दरम्यान २ जूनला शोभायात्रा काढण्यात आली. विहिंपने दुर्गावाहिनी शोभायात्रेसाठी निगडी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्यावर पोलीस प्रशासनाने आम्हाला पोहोच दिली. यासह पोलीस बंदोबस्तही दिला. त्यामुळे विनापरवानगी हे कलम लागू होत नाही. पोलीस प्रशासनाने पोहोच दिल्यामुळे व जमावबंदी बद्दल कोणतीही आगाऊ सूचना न दिल्यामुळे शोभायात्रेचे आयोजन केले. यासाठी निकाळजे व पवार या पोलीस अधिकारयांसह पोलीस बंदोबस्त दिला. मात्र, हे दोन्ही अधिकारी जाणीवपूर्वक दुटप्पीपणाने वागत आपल्या कर्तव्यात कसूर करत होते. पूर्वगृहदूषित मानसिकतेने त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत व वाद घातला. दरम्यान, आमच्याकडील शस्त्रे खोटी आहेत, ती तपासावीत असे आवाहनही त्यांना केले असताना पोलीस अधिकाऱ्यांनी शस्त्रे तपासली नाहीत. शिवाय ही शस्त्रे खरी आहेत असा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला. व या अहवालाच्या आधारे खोटी तक्रार दाखल केली. त्यामुळे जाणीवपुर्वक, सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल करण्यात आला.      दरम्यान, अशाप्रकारे युवतींच्या गटावर व ज्यांनी परवानगी मागितली असा विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करणे हे अनाकलनीय आहे. या घटनेमुळे विश्व हिंदू परिषदेची जाणीवपुर्वक देशभरात बदनामी करण्याचा प्रयत्न दिसतो. निकाळजे व पवार हे पोलीस अधिकारी कायद्याचा गैरवापर करत कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. तरी पोलीस प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा व दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिला