शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Video : दौंडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ...! ४ चोर आले, चक्क ATM च घेऊन गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:21 IST

दरवाजाचे लॉक व लोखंडी जाळी तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. घरातील सदस्यांना आवाज आल्याने त्यांनी तत्काळ आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले.

वरवंड (ता. दौंड) : दौंड तालुक्यातील वरवंड, कुसेगाव व पडवी परिसरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. घरफोडी, दुचाकी चोरीचे प्रयत्न आणि सर्वात गंभीर म्हणजे वरवंड येथील एटीएम मशीनच उचलून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरवंड येथील एका घराच्या सेफ्टी डोअरची तोडफोड करून आत घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरवाजाचे लॉक व लोखंडी जाळी तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. घरातील सदस्यांना आवाज आल्याने त्यांनी तत्काळ आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले. या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओत परिसरातील दोन दुचाकींचे लॉक तोडण्याचा प्रयत्नही या चोरटयांनी केल्याचे दिसते. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि ग्राम सुरक्षा दलाला माहिती देण्यात आल्याने चोरट्यांचा डाव फसला. दरम्यान, एटीएम मशीनच चोरट्यांनी वाहनातून उचलून नेल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांचा तपास सुरूघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून कुसेगाव-पडवी भागात चार संशयित फिरताना दिसल्याची माहिती आहे. संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.नागरिकांकडून गस्त वाढवण्याची मागणीसलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Daund: Thieves' Rampage! ATM Stolen in Brazen Heist.

Web Summary : Thieves terrorized Daund, attempting burglaries and stealing an ATM in Varvand. Residents' alertness foiled some attempts. Police are investigating, reviewing CCTV footage, and searching for suspects. Locals demand increased night patrols.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या