धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:14 IST2025-09-12T11:12:02+5:302025-09-12T11:14:23+5:30

एमबीए झालेला मुलगा नपुंसक असताना ही बाब अंधारात ठेवून लग्न लावून दिले. मूल व्हावे, यासाठी मुलाने व सासूने सासऱ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्रास दिला.

crime news Husband impotent, father-in-law demanded sex for grandson Serious allegation by former ACP's daughter-in-law | धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप

धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप

पुणे - एमबीए झालेला मुलगा नपुंसक असताना ही बाब अंधारात ठेवून लग्न लावून दिले. मूल व्हावे, यासाठी मुलाने व सासूने सासऱ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्रास दिला. विवाहिता घरात एकटी असताना सासरा निवृत्त सहायक पोलिस आयुक्ताने रूममध्ये शिरून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त (६१), त्याची पत्नी (५६) आणि मुलगा (३५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत एका ३० वर्षीय विवाहितेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ५ मे ते २३ जून दरम्यान घडली आहे. ही घटना घडल्यानंतर हे सर्व कुटुंब घराला कुलूप लावून पसार झाले असल्याचे सहकारनगर पोलिसांनी सांगितले.

अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील सासरे हे निवृत्त सहायक पोलिस आयुक्त आहेत. त्यांचा मुलगा एमबीए आहे. मुलगा नपुंसक आहे, हे माहिती असताना ती गोष्ट लपवून ठेवून पुणे जिल्ह्यातील तरुणीशी त्याचा मे महिन्यात विवाह केला. आपला पती हा नपुंसक असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यावर मूल व्हावे, यासाठी पती व सासू यांनी सासऱ्यासोबत संबंध ठेवावेत, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. 

२३ जून रोजी फिर्यादी रूममध्ये एकटी असताना सासरा जबरदस्तीने रूममध्ये शिरला. आपल्या सुनेला पदाची व ओळखीची भीती दाखवून आपल्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल मागणी करून तिचा हात धरून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याला तिने विरोध केल्यावर जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादी या माहेरी निघून गेल्या. त्यानंतर तिने आता याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच आरोपी कुटुंब घर बंद करून पसार झाल्याचे दिसून आले. पोलिस उपनिरीक्षक काळे या पुढील तपास करत आहेत.

Web Title: crime news Husband impotent, father-in-law demanded sex for grandson Serious allegation by former ACP's daughter-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.