येरवड्यात खळबळ! बहिणीला पळवून नेल्याने संतापलेल्या तरुणाने मुलाच्या वडिलाला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:23 IST2024-06-24T15:16:56+5:302024-06-24T15:23:01+5:30
प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीचा कोयत्याने वार करत अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आलाय....

येरवड्यात खळबळ! बहिणीला पळवून नेल्याने संतापलेल्या तरुणाने मुलाच्या वडिलाला संपवले
- किरण शिंदे
पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीचा कोयत्याने वार करत अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आलाय. सोमवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. कटाळू कचरू लहाडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इस्माईल शेख नामक तरुणाने त्याच्यावर कोयत्याने वार केले. येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राजीव गांधी नगर भागात ही खुनाची घटना घडली. आज (सोमवारी) दुपारी पावने दोनच्या सुमारास कटाळू कचरू लहाडे (वय 60 वर्षे) याला आरोपी इस्माईल रियाज शेखने धारदार शस्त्राने तोंडावर वार करून मारले. आरोपीच्या बहिणीस मयताच्या मुलाने पळवल्याने हा खून केला असल्याचे सांगितले जातेय.
आरोपी इस्माईल रियाज शेख (वय २५ वर्षे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयताचा मृतदेह पोस्टमार्टम करता पाठवून देण्यात आलेला आहे. घटनास्थळी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे, अशी माहिती येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली.