शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षक अभियंत्यासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: May 19, 2015 01:05 IST

प्रकल्पप्रमुख संदीप साळवी, ठेकेदार रघुनाथ महाबळ यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : सफाई कामगारांना साबण, गमबूट, हातमोजे, मास्क अशा सुविधा न पुरविता त्यांना मलविसर्जनयुक्त पाण्यात काम करण्यास भाग पाडल्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन भांडारप्रमुख व सध्याचे विद्युत अधीक्षक श्रीनिवास कंदुल, प्रकल्पप्रमुख संदीप साळवी, ठेकेदार रघुनाथ महाबळ यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार निवारण समितीचे सदस्य सतीश लालबिगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, द प्रोव्हिबिशन अ‍ॅक्ट एम्प्लॉयमेंट अ‍ॅज मॅन्युअल स्कॅवेजर्स अ‍ॅन्ड देअर रिहॅबिलिटेशन अ‍ॅक्ट २०१३ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क येथील भैरोबा पंपिंग स्टेशन येथील मलनिस्सारण प्रकल्प ठेकेदारी पद्धतीने अनेक वर्षांपासून ठेकेदार रघुनाथ महाबळ हे चालवीत आहेत. या प्रकल्पावरील कर्मचाऱ्यांना साबण, गमबूट, हातमोजे, युनिफॉर्म इत्यादी सुविधा महापालिकेने पुरविल्या नाहीत. ते सातत्याने मलविसर्जनयुक्त पाण्यात अनेक वर्षांपासून काम करीत असूनही त्यांच्याकडे मनपा अधिकारी व ठेकेदारांनी दुर्लक्ष केले आहे.सफाई कर्मचारी आयोगाकडे यासंदर्भात भारतीय कर्मचारी संघटनेच्या वतीने तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन आयोगाने कौन्सिल हॉल येथे वारंवार बैठका घेतल्या. आयोगाच्या सदस्या डॉ. लता ओमप्रकाश महातो यांना मनपा अधिकाऱ्यांकडून खोटी माहिती देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांना सर्व साधने व योग्य वेतन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रकल्प बंद असल्याने कर्मचारी कार्यरत नसल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी) 1डॉ. लता महातो यांनी १० मे रोजी अचानक या प्रकल्पास भेट दिली, त्या वेळी प्रत्यक्षात प्रकल्प चालू होता. सफाई कर्मचारी मलमिश्रित पाण्यात काम करीत असल्याचे त्यांना आढळून आले. 2कर्मचाऱ्यांशी डॉ. महातो यांनी चर्चा केली, त्या वेळी महापालिकेने कोणत्याही सुविधा, साधने पुरविली नाहीत तसेच वेतन कायद्याप्रमाणे वेतनही दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. 3या वेळी महातो यांनी श्रीनिवास कंदुल यांना फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही व त्या ठिकाणी जाण्याचे टाळले. यामुळे आयोगाच्या सदस्यांचा अवमान झाला. याची गंभीर दखल घेत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.