Pathaan Movie | पुण्यात ‘पठाण’ची पोस्टर फाडणाऱ्या बजरंग दल कार्यकर्त्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 21:12 IST2023-01-24T21:11:02+5:302023-01-24T21:12:52+5:30
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल...

Pathaan Movie | पुण्यात ‘पठाण’ची पोस्टर फाडणाऱ्या बजरंग दल कार्यकर्त्यांवर गुन्हा
पुणे : राहुल चित्रपटगृहाच्या आवारात शिरून तेथील ‘पठाण’ चित्रपटाची बॅनर फाडत घोषणाबाजी करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
त्यात पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसचिव नितीन महाजन व त्यांच्या १५ ते १९ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याबाबत पोलिस शिपाई अंकुश कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार राहुल चित्रपटगृहात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला होता.
पठाण चित्रपटातील एका गाण्यात दीपिका पादुकोन हिने भगवी वस्त्रे घालून अश्लील नृत्य केल्याने हिंदुत्ववादी संघटना खवळल्या हाेत्या. त्यांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. पठाण चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचे पोस्टर राहुल चित्रपटगृहात लावण्यात आले होते. हे समजल्यावर बजरंग दलाचे काही कार्यकर्ते तेथे जमले व त्यांनी पोस्टर फाडून शाहरूख खान विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे गुन्हा दाखल केला आहे.