Covid vaccination दोन दिवसांनी अखेर पुण्यात लसीकरण सुरू होणार .. पण !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:17 PM2021-05-18T19:17:03+5:302021-05-18T19:57:14+5:30

एक दिवस पुरेल इतकाच साठा. फक्त दुसऱ्या टप्प्यातील नागरिकांना मिळणार कोव्हीशिल्ड....

Covid vaccination will finally start in Pune in two days | Covid vaccination दोन दिवसांनी अखेर पुण्यात लसीकरण सुरू होणार .. पण !

Covid vaccination दोन दिवसांनी अखेर पुण्यात लसीकरण सुरू होणार .. पण !

Next

पुणे: दोन दिवसांच्या ब्रेकनंतर अखेर पुण्यात पुन्हा एकदा लसीकरण सुरू होणार आहे. अर्थात यात सुद्धा फक्त एक दिवस पुरेल इतक्याच लसी आल्याने फक्त दुसऱ्या टप्प्यातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. 

पुणे शहरात लस संपल्याने कोव्हीशील्ड चे लसीकरण ४ दिवस तर संपूर्ण लसीकरण गेले दोन दिवस बंद होते. त्यानंतर आज अखेर राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला लसी प्राप्त झाल्या आहेत. अर्थात यामध्ये फक्त कोव्हीशिल्डचा लसी प्राप्त झाल्या आहेत. त्याही फक्त ७५०० लसी आज देण्यात आल्या आहेत. 

यामुळे उद्या लसीकरण सुरू होणार असले तरी देखील हा साठा एकाच दिवस पुरणार आहे. आणि त्यामुळे फक्त दुसऱ्या डोस साठी नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्या महापालिकेचा केंद्रांवर दुसऱ्या डोस साठीच यावे असे महापालिकेचा वतीने सांगण्यात आले आहे. 

यामध्ये " ४५ वर्षांवरील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, हेल्थ केअर वर्कर्स आणि आरोग्य यांच्यासाठी उद्या एकूण ७३ केंद्र उपलब्ध असतील. सर्व केंद्र कोविशील्ड असतील. ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाईल. सर्व केंद्रांववरील लस केवळ दुसऱ्या डोससाठी उपलब्ध असेल. पहिला डोस दिला जाणार नाही.१० टक्के हे ऑनलाईन अपॉइंटमेंट/स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना दिले जातील. ९० टक्के डोस हे 'वॉक इन'साठी असतील.१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पूर्णपणे बंद असेल." अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Covid vaccination will finally start in Pune in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app