शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

चिंताजनक! मे-जून महिन्यातील कोरोनाबाधितांच्या पुनरावृत्तीकडे पुण्याची वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 8:38 PM

पुणे शहरात कोरोनाबाधितांची वाढ दिवसागणिक वाढतच चालली असून, शहर पुन्हा मे-जून २०२० च्या कोरोनाबाधिताच्या वाढीच्या पुनरावृत्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे़

पुणे शहरात कोरोनाबाधितांची वाढ दिवसागणिक वाढतच चालली असून, शहर पुन्हा मे-जून २०२० च्या कोरोनाबाधिताच्या वाढीच्या पुनरावृत्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे़. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधितांची वाढ होत असून, रविवारी (दि़२१ फेब्रुवारी) रोजी सन २०२१ मधील सर्वाधिक कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ही संख्या ६३४ इतकी आहे़. (covid cases increases rapidly in pune)    रविवारी दिवसभरात पुणे शहरात ४ हजार ७०७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १३़४६ टक्के इतकी आहे़ शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारीही दररोज वाढत असून, १२ टक्क्यांपर्यंतही ही वाढ आता साडेतेरा टक्क्यांवर गेली़ तर सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ८९६ इतकी झाली आहे़ 

शहरात ९ मार्च,२०२० ला पहिला कोरोनाबाधित आढल्यानंतर, कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच गेला़ व मेच्या अखेरीस तथा जूनच्या पहिल्या आठवड्यात सहाशेच्या पुढे गेला़ नंतर सप्टेंबर मध्ये दोन हजारापर्यंत गेलेला ही कोरोनाबाधितांची संख्या हळू-हळू कमी होत जानेवारीत ९८ पर्यंत आली होती़ दरम्यान नागरिकांचा मास्कविना बिनधास्त वावर, फिजिकल डिस्टसिंगच्या नियमावलीची पायमल्ली व जागोजागी होणारी गर्दी यामुळे आजमितीला पुन्हा कोरोनाबाधितांची वाढ झपाट्याने होऊ लागली आहे़ 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत आॅक्सिजनसह उपचार घेणाºया कोरोनाबाधितांची संख्या ३५० वर गेली असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही १६४ इतकी झाली आहे़ दरम्यान आज दिवसभरात २९४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ 

शहरात आजपर्यंत १० लाख ९९ हजार १३४ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९७ हजार ९६४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९० हजार २४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़  आज दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला असून, आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८२६ जणांचा मृत्यू झाला आहे़ शहराची स्थिती  शहराचा पॉझिटिव्हिटी रेट गेल्या २१ दिवसांमध्ये दुप्पट झाला आहे. १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान पॉझिटिव्हिटी रेट ५.६५ टक्के इतका होता. १५-२१ फेब्रुवारीदरम्यान हा आकडा १०.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मृत्यूदर मात्र १ टक्क्यांच्या खाली असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.शहरातील आठवडानिहाय कोरोना रूग्ण स्थिती -कालावधी             चाचण्या    कोरोनाग्रस्त रुग्ण      पॉझिटिव्हिटी रेट१-७ फेब्रुवारी     २२, ५६४    १२७५              ५.६५८-१४ फेब्रुवारी     २१,२४८      १८१६              ८.५४१५-२१ फेब्रुवारी     २७,३१९       २९७०              १०.८७ 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस