शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील आयटी कंपनीत ४५० खाटांचे अद्ययावत 'कोविड केअर' रुग्णालय; विप्रो कंपनीचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 16:11 IST

हिंजवडी येथे आयटीकंपनीच्या पुढाकारातून उभे करण्यात आलेले प्रशस्त 'कोविड केअर' रूग्णालय हे राज्यातील पहिले स्वतंत्र अद्ययावत असे रुग्णालय असणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरोना बाधितांची तपासणी करून तत्काळ उपचार करण्यास मदत होणार

पुणे : हिंजवडी येथील आयटी कंपनीत शासनाचा आरोग्य विभाग, पुणे जिल्हा परिषद आणि विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ४५० खाटांचे अद्ययावत अशा 'कोविड केअर' रुग्णालयाचे गुरुवारी (दि.११) हस्तांतरण करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. 

हिंजवडी येथे आयटीकंपनीच्या पुढाकारातून उभे करण्यात आलेले प्रशस्त 'कोविड केअर' रूग्णालय हे राज्यातील पहिले स्वतंत्र अद्ययावत असे रुग्णालय असणार आहे. कोरोना महामारीचा देशात शिरकाव झाल्यानंतर विषाणूंचा संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी सर्व स्तरावरील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या. युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना करतानाच, अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वतंत्र कोविड रुग्णालय उभी करण्यात आली. राज्यात उपलब्ध असलेल्या रुग्णालयात स्वतंत्र कोरोना विभाग सुरू करण्यात आला. 

कोरोना विषाणूंचा वाढता  प्रादुर्भाव आणि स्वतंत्र  रूग्णालयाची गरज लक्षात घेऊन हिंजवडी आयटीपार्क मध्ये विप्रो कंपनीच्या विशेष सहकार्याने चारशे पन्नास खाटांचे अद्ययावत कोविड केअर रुग्णालय उभारण्यात आले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाबाधितांवर याठिकाणी उपचार करण्यात येणार आहे, तसेच तिसऱ्या  टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलविण्यापुर्वी रुग्णांची प्रकृती स्थिर करण्यासाठी विशेष अशा बारा खाटांची याठिकाणी सोय करण्यात आली आहे. येथे नियुक्त केलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष संकुलात चोवीस खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हिंजवडी फेज एक मध्ये विप्रो कंपनीच्या आवारातच हे भव्य कोविड रुग्णालय उभे राहिल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची तपासणी करून तत्काळ उपचार करण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारRajesh Topeराजेश टोपेUddhav Thackerayउद्धव ठाकरेhospitalहॉस्पिटल