शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

नाटककारांमध्ये ठोस राजकीय भाष्य नोंदविण्याची धमक हवी : अतुल पेठे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 1:11 PM

ठोस राजकीय भाष्य नोंदविण्याची धमकच ही रंगभूमीवरील राजकीय नाटकांची वानवा भरुन काढेल..

- दीपक कुलकर्णी - भारतीय रंगभूमीने विविध परि वर्तनाचे कंगोरे अनुभवत कात टाकत आहे. तसेच रंगभूमीवर कार्यरत असलेल्या रंगकर्मींमध्ये प्रचंड जोश, उत्साह, प्रयोगशीलता , स्वतंत्र विचार ताकदीने सादर करण्याची वैशिष्टयपूर्ण शैली आहे. ही अनोखी शैली आणि संकटांवर मात करण्याची त्यांची जिद्द रंगकर्मींची ओळख आहे.परंतु, त्यांना या प्रवासात गरज आहे ती उत्कृष्ट मार्गदर्शकांची...तसेच रंगभूमीवर सामाजिक विषयांवरची भरपूर नाटके आलेली आहेत. पण या नाटकांच्या प्रमाणात राजकीय नाटकांची संख्या अत्यंत नगण्य अशी आहे. ठोस राजकीय भाष्य नोंदविण्याची धमकच ही रंगभूमीवरील राजकीय नाटकांची वानवा भरुन काढेल... हे सडेतोड मत व्यक्त केले आहे.. ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त त्यांच्याशी साधलेला खास संवाद..  जागतिक पातळीवर विचार करता सध्या भारतीय रंगभूमीची तुलना कशी कराल .? - स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये वेगवेगळ््या प्रकारे प्रयोगशीलता, आधुनिकतेची कास धरत महत्वाच्या टप्प्यांवर भारतीय रंगभूमी आज उभी आहे. १९४७ ला स्वातंत्र्य मि़ळल्यावर चार प्रांतातील काही लेखक पुढे आले. स्वत: च्या मूळांचा शोध हा भारतीय रंगभूमीसमोरील एक आव्हान होते. चार प्रांतातून अत्यंत महत्वाचे   चार नाटककार आलेले मोहन राकेश, विजय तेंडुलकर, बादल सरकार, गिरीश कर्नाड यांसारखे पुढे आले. विविध रंगभूमी फोफावू लागली.एनएसडी सारखी महत्वाची राष्ट्रीय संस्था जिने महत्वाचे काम राष्ट्रीय स्तरावर केले. ज्यातून  रतनजीयां , कन्हेैय्यालाल, हबीब तन्वीरसारखे ज्येष्ठ दिग्दर्शक पुढे घडले. प्रांतात स्वत:चे थिएटर गु्रप समोर आले. उत्पल दत्त, महेश एलकुंचवार, विजय तेंडुलकर , सतीश आळेकर, को, पु. देशपांडे आदींच्या योगदानाने साकारलेले भक्कम युग संपले.   जागतिकीकरण, खासगीकरण , उदात्तीकरण यांचा रंगभूमीवर कितपत परिणाम झाला .़? - ११९० नंतर दुसरा टप्पा सुरु झालेला दिसतो. जिथे जागतिकीकरण ,खासगीकरण, उदात्तीकरण, झाले .त्याने जगाचे अर्थच खरोखर बदलली आणि र्व्हच्युल रिअलिटी आली. रंगभूमी संदर्भात काळ आणि अवकाश या दोन गोष्टी फार महत्वाच्या आाहेत. मोबाईल , इंटरनेट यामुळे लोकांची कनेक्टेड असणे या माध्यमांनी त्याचे अर्थ बदलला. १९९० नंतर माणसे विखुरली, गेली विखंडीत झाली त्याच्यामधली रंगभूमीचा शोधण़्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. वेगवेगळ््या प्रांतात ही माणसे काम करत असतात. त्यामध्ये माझे समकालीन मित्र मराठीपुरते , जयंत पवार, राजीव नाईक, अजित दळवी ,संजय पवार  मकरंद साठे, प्रेमानंद गज्वी , प्रशांत दळवी यांसारखे लेखक असतील, चंद्रकात कुलकर्णी, विजय केंकरे, वामन केंद्रे, यांसारखे दिग्दर्शक आहेत. त्यांनी वेगवेगळ््या प्रकारची व्यामिश्र गुंतागुतीची वेगवेगळे प्रश्न अस्तित्वाची मांडणारी रंगभूमी आहे. या सर्वांची नाटके आपण पाहिली तर लक्षात येईल की त्यात १९९० नंतरच्या संभ्रमावस्थेचा शोध घेण्याचा प्रत्येकाने केला आहे.   टिव्ही, मालिका , सिनेमा यांच्यासह, सोशल मीडया आजी माध्यमांसोबतच्या स्पर्धेत रंगभूमीचे अस्तित्व अधोरेखित आहे.़? - सध्या आपण सर्वजण रंगभूमीच्या वाटचालीत तिसºया टप्प्यावर आहोत. जिथे नवीन रंगभमीचा उदय होतोय. या परिस्थितीत विविध समाजमाध्यमे स्वत:ची जागा अबाधित करण्यासाठी झगडत आहे. त्यात रंगभूमीला या कालखंडामध्ये टीव्ही, मीडिया, मालिका, सिनेमा, कम्प्युटर, वेबसीरिज आदी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा करावी लागणार आहे. तसेच यांमाघ्यमांपेक्षा रंगभूमी नेमके वेगळे काय देऊ शकते याचा विचार करुनच या प्रांतात काम करणे आवश्यक आहे.    सध्याचे वातावरण रंगभूमीसाठी पोषक आहे कां.़? - सध्याच्या काळात रंगभूमीसाठी पुरक वातावरण आहे का तर त्याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल..कारण रंगभूमी म्हणजे चित्रपट मालिका या मध्ये काम करण्यासाठी मधला दुवा आहे अशीच बºयाच मंडळीची भूमिका आहे. मात्र, जसे चित्रपट , मालिका या कार्यक्षेत्रांमध्ये पूर्णवेळ काम केले जाते तसेच नाटक हे सुध्दा पूर्णवेळ काम करण्याचे माध्यम आहे. अर्ध्या अर्ध्या अवस्थेत या सर्व माध्यमांमध्ये  काम करणे सर्व कलाकारांसाठी धोक्याचे आणि नुकसानकारक आहे. नाटक कारण मला खंत या गोष्टीची वाटते की, राज्य नाट्य स्पर्धा सोडली, पुणे , मुंबई, जिल्हा, तालुका पातळीवर थोडीफार गडबड सोडली तर रंगभूमीविषयी सगळा आनंदी आनंदच आहे असे म्हणावे लागेल. यातून प्रयोगशीलतसह, सर्जनशालता हरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर, औरंगाबाद,  सोलापूर याच्या शहरांंसह गावोगावी रंगभूमी व नाटक जिवंत राहण्यासाठी सरकार व सांस्कृतिक विभागाने तर प्रयत्न केले पाहिजेच पण खेडेगावातील नागरिकांनी सुध्दा हिरिरीने पुढाकार घेणे तितकेच आवश्यक आहे.

संवादाची साधने वाढली मात्र त्याचा रंगभूमीला कितपत फायदा ..? दिवसेंदिवस आपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्तम प्रगती करत आहोत. या तंत्रज्ञानाच्या काळात जग एका हाकेवर आले असे आपण म्हणतो. पण प्रत्येकामधला संवाद वाढला तसा कलेच्या प्रांतात देखील दूरदूरवर घडले. पण संवादानंतरची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विचारांची आदान प्रदान.. ही रंगभूमीच्या प्रांतात देवाण -घेवाण पार कमी प्रमाणात होत आहे. खरे तर अधिकाधिक प्रमाणात झाली तर रंगभूमीचे रुप वैविध्यतेने नटलेले व सर्वसमावेशक असे असेल..पण आदान प्रदान जर झाले नाही तर कलाकृतींवर एकसुरी आल्याशिवाय राहणार नाही. तो रंगभूमीसाठी मारक आहे. 

रंगभूमीवर राजकीय नाटकांची वानवा का.. ? -आपण राजकीय अभिप्राय किंवा मत नोंदविताना नेहमी कचरतो. अनेकवेळा आपल्या मनातील सत्य, प्रामाणिक राजकीय भावना ठोस पध्दतीने व्यक्त करता येत नाही. हे अतिशय चुकीचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाºया लोकशाहीच्या देशात आपण सर्वजण राहतो. तिथे खरंतर सर्वांनी योग्य अयोग्य भूमिका वेळोवेळी सडेतोड पध्दतीने मांडली पाहिजे. ते प्रमाण वाढले की रंगभूमीवर राजकीय नाटके वाढलेले दिसणार यात शंका नाही. ........ कलेच्या प्रांतात बंडखोरीने खरोखर क्रांती घडविली..? - रंगभूमीवर पूर्वीच्याकाळी विशिष्ट वगार्चे किंवा शहरी भागाचे वर्चस्व पाहायला मिळत..पण ही जेव्हा नामदेव ढसाळ किंवा नागराज मंजुळे यांसारख्या लोकांनी जी प्रस्थापितांना धक्का देत कलेच्या प्रांतात स्वत:च्या कर्तृत्वाने मोठी क्रांती घडवून आणली ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्यानंतर रंगभूमीवर दलित , वंचित, दुर्बल घटकांनी पाय रोवणयास सुरुवात केली. आणि खºया अथार्ने रंगभूमीवर प्रयोगशीलता , सर्जनशीलतेचे अनोखे दर्शन होवू लागले.   रंगभूमीवरील प्रादेशिक भाषांमध्ये भेदाभेद आढळतो का...़?- रंगभूमीवर कोणत्याही एका भाषेचे मक्तेदारी अपेक्षित नाही. आपल्याकडील सर्व भाषांमध्ये एक वेगळा स्वत:चा बाज , लहेजा स्वरुप ओळख आहे. वºहाडी, खानदेशी, मालवणी, सोलापूरी, कोकणी, ऐरणी, या भाषेमध्यो एकप्रकारे गोडवा आहे. आणि जेव्हा मच्छिंद्र कांबळे यांनी मालवणी भाषेचा वापर करुन रंगभूमीवर नाटक आणले त्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. म्हणून वेगवेगळ््या प्रांतातील नवीन रंगकर्मीच्या नाटकामंध्ये तेथील बोेलीभाषेचा वापर प्रभावी ठरतो.  नाट्यगृहांची चौकट मोडून रंगभूमीवर नवनवीन प्रयोग होताहेत त्याविषयी आपण काय सांगाल ..? - नवीन रंगकर्मींमध्ये प्रचंड उत्साह,जोश ,शैली, प्रयोगशीलता आणि स्वत:चे विचार ठोस पध्दतीने मांडण्याची एक ताकद आहे. यातून ही मंडळी जुन्या चौकटींना छेद नवनवीन परिवर्तनाचे दरवाजे ठोठावत असतात. यात आलोक राजवाडे , पर्ण पेठे, धर्मकीर्ती सुमंत, ओंकार गोवर्धन, सुव्रत जोशी, मकरंद साठे यांसारखी तरुण मंडळी वेगळी वाट निवडून देखील खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आहेत. घरोघरी नाटक, बागेतले नाटक, पथनाट्य , स्टँडअप कॉमेडी असे भन्नाट प्रयोग पाहायला मिळतात. नाटक हे जसे हजार प्रेक्षकांसाठी आहे तसे ते पाच प्रेक्षकांसाठी सुध्दा आहे.  ............. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणAtul Petheअतुल पेठेTheatreनाटक