Accident: मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला चारचाकीची धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 05:15 PM2021-12-12T17:15:27+5:302021-12-12T17:15:56+5:30

चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला

The couple who went for a morning walk was hit by a four wheeler in pimpri | Accident: मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला चारचाकीची धडक

Accident: मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला चारचाकीची धडक

googlenewsNext

पिंपरी : मॉर्निंग वॉक करणाऱ्या दाम्पत्याला चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ताथवडे येथे शनिवारी (दि. ११) सकाळी ही घटना घडली. ज्ञानेश्वर कुंभार आणि रंजना कुंभार अशी जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा किशोर ज्ञानेश्वर कुंभार (वय ३६, तिघेही रा. निंबाळकर नगर, ताथवडे) यांनी शनिवारी (दि. ११) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ज्ञानेश्वर कुंभार आणि रंजना कुंभार हे दांपत्य रावेतकडे जाणाऱ्या मार्गावरून ताथवडे येथे मॉर्निंग वॉक करीत चालले होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने कुंभार दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ज्ञानेश्वर कुंभार यांचा पाय फॅक्‍चर झाला असून डोक्‍यालाही मार लागला आहे. तसेच आई रंजना यांच्या कपाळास गंभीर दुखापत झाली आहे. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: The couple who went for a morning walk was hit by a four wheeler in pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.