शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : इतर देशांच्या तुलनेत भारतात काेराेनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 21:53 IST

काेराेनाची लागण हाे्ण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे.

पुणे : भारतात ‘कोविड-१९’ या रोगाची लागण झाली अथवा नाही, याची चाचणी घेण्याचे प्रमाण कमी असल्याने जगातील इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमी असल्याचे मत देशातील तसेच देशाबाहेरील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. असे असले तरी, देशातील कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला सुमारे ८ आठवडे उलटली आहेत. तरीही अद्याप ‘कोविड-१९’ या रोगाची लागण झाली अथवा नाही, याची चाचणी न केलेल्या मात्र, या आजाराची लक्षणे आढळल्यामुळे डॉक्टरांकडे धाव घेणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रासह देशात खूपच मर्यादित आहे. 

भारतात ३१ जानेवारीला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला होता. त्या घटनेला बुधवारी (दि. २५) ५४ दिवस म्हणजेच सुमारे ८ आठवडे लोटले आहेत. या काळात भारतात सुमारे २२ हजार ९२८ चाचण्या झाल्या. यात आतापर्यंत ६१२ जण पॉझिटिव्ह (४० जण बरे झाले, १० जणांचा मृत्यू, ५६२ जणांवर अद्याप उपचार सुरू) आढळले. इटलीत या ५४ दिवसांच्या काळात बाधितांची संख्या २ वरून ६९ हजार १७६ इतकी प्रचंड वाढली आहे. यादरम्यान तेथे २ लाख ९६ हजार ९६४ चाचण्या घेण्यात आल्या. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये बाधितांची संख्या अनुक्रमे ५५ हजार २३८ आणि ८ हजार १६७ इतकी आहे.

कोरोनाची लागण झाली अथवा नाही, याची तपासणी करणाºया चाचण्या आपल्याकडेअतिशय कमी प्रमाणात झाल्या हे खरे आहे. मात्र, अशी चाचणी न केलेल्या पण 'कोविड-१९' या आजाराची लक्षणे आढळली म्हणून डॉक्टरांकडे धाव घेणारे रुग्ण आळल्याची नोंद अपवाद वगळता दिसत नाही. ही जीवघेणी साथ आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक  डाऊन जाहीर केला आहे. यामुळे माहिती उपलब्ध होण्यावर मर्यादा आली असली तरी सोशल मीडिया या लॉक डाऊनच्या काळात पूर्वीपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. ‘कोविड-१९’ची चाचणी न झालेले पण या आजाराची लक्षणे आढळणारे रुग्ण देशात लक्षणीय प्रमाणात आढळले असते तर सोशल मीडियावर याचे पडसाद नक्कीच उमटले असते. शिवाय, आरोग्य खात्याकडेदेखील तशी नोंद झाली असती. मात्र, या दोन्ही पातळीवर अद्यापपर्यंत तरी चिंता वाढावी, असा प्रतिसाद आलेला नाही. याचा अर्थ, या रोगाचा शिरकाव झाल्याच्या ८ आठवड्यानंतर म्हणजे, आतापर्यंत तरी 'कम्युनिटी इन्फेक्शन' अर्थात सामाजिक लागण होण्याचा टप्पा नियंत्रणात ठेवण्यामध्ये शासन, प्रशासन आणि जनता यशस्वी ठरल्याचे चित्र आहे.

... तरीही चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवेइतर देशांमध्ये हा विषाणू ज्या वेगाने पसरला आहे, तितके जास्त प्रमाण आपल्या देशात कदाचित नसेलही. पण, सामुहिक लागण होण्याच्या टप्प्यात आपण सध्या आहोत. या टप्प्यात ‘कोविड-१९’ची लागण नियंत्रणात ठेवण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण आपण वाढवायला हवे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांशी शिफारस पुरेशी ठरविण्यात यावी. सध्या असे होत नाही. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांच्या अंंतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांनी सुचविल्यास संबंधित संशयिताची चाचणी घेणे सुरू करायला हवे. असे झाल्यास आपण हा आजार पसरण्याला अधिक जास्त प्रमाणात प्रतिबंध करू शकू.- डॉ. अनंत फडके, सहसमन्वयक,  जनआरोग्य अभियान 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत