शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
3
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
4
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
5
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
6
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
7
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
8
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
9
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
10
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
11
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
12
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
13
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
14
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

CoronaVirus : मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या नातेवाईकांना दिला आसरा, पोलिसांनी केला घरमालकांवरच  गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 10:46 PM

मुंबई ,ठाणे व पुणे येथे कोरोना फैलाव जास्त वाढल्याने ग्रामीण भागातील अंथुर्णे ता इंदापुर येथे सुमारे ११ नागरीक व नातेवाईकांनी  आसरा घेतला.

कळस : राज्यात शहरी भागातील कोरोना विषाणु संसर्ग फैलावामुळे नातेवाईक नागरिकांना आपल्या घरात आश्रय दिल्याचा प्रकार  अंथुर्णे ( ता इंदापुर) येथे उघड झाला आहे. येथील चार घर मालकांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई ,ठाणे व पुणे येथे कोरोना फैलाव जास्त वाढल्याने ग्रामीण भागातील अंथुर्णे ता इंदापुर येथे सुमारे ११ नागरीक व नातेवाईकांनी  आसरा घेतला. यासाठी घरमालकांनी त्यांना सहकार्य केले. मात्र , वालचंदनगर पोलिस ठाण्यात बाहेरुन आलेल्या नागरीकांऐवजी थेट घर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्यामुळे  घरमालक अडचणीत आले आहेत.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतेही सहकार्य न करता हयगय करण्यात आली आहे .  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच महाराष्ट्र शासन सार्वजनीक आरोग्य विभाग यांचेकडील  अधिसुची नुसार  कोरोना विषाणुचा प्रसारास आळा बसण्यासाठी  सार्वजनीक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे.

मास्क न वापरता तसेच आलेल्या लोकांना घरामध्ये संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव होईल, हे माहीत असतानाही त्यांना आपले घरामध्ये अश्रय दिला .त्यामुळे सिताराम कोंडीबा शिंदे , बापु विठ्ठल गायकवाड ,संजय विठ्ठल जाधव ,नारायण विठ्ठल जाधव (सर्व रा. अंथुर्णे ता.इंदापुर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर फिर्याद ग्रामसेवक दिपक भोसले यांनी दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार प्रकाश माने हे करीत आहेत .

मुंबई, ठाणे, पुणे येथुन अनेक नागरीक ग्रामीण भागात पा गैरमार्गाने  येत आहेत त्यांनी गावपातळीवर आप्पती निवारण समितीला माहिती देवुन क्वारंटाईन झाले पाहिजे माहिती लपवुन ठेवल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे 

- दिलीप पवार सहायक पोलिस निरीक्षक ,वालचंदनगर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस